श्रीकृष्णाची आरती

ओवाळूं आरती मदनगोपाळा ।
श्यामसुंदर गळां वैजयंतीमाळा ॥ धृ० ॥

चरणकमल ज्याचें अति सुकुमार ।
ध्वजवज्रांकुश(टीप १) ब्रीदाचा तोडर ॥ १ ॥

नाभिकमळ ज्याचें ब्रह्मयाचें स्थान ।
हृदयीं पदक शोभे श्रीवत्सलांछन ॥ २ ॥

मुखकमल पाहतां सुखाचिया कोटी ।
वेधले मानस हारपली दृष्टी ॥ ३ ॥

जडितमुगुट ज्याचा दैदीप्यमान ।
तेणें तेजें कोंदलें अवघें त्रिभुवन ॥ ४ ॥

एका जनार्दनीं देखियेलें रूप ।
पाहतां अवघें झाले तद्रूप ॥ ५ ॥

– संत एकनाथ

टीप १ – संत एकनाथ महाराज रचित मूळ आरतीत ध्वजवज्रांकुशरेखा चरणीं असे आहे. आरती लयीत म्हणता यावी, यासाठी ध्वजवज्रांकुशरेखा चरणीं याऐवजी ध्वजवज्रांकुश अशी शब्दरचना केली आहे. आरती लयीत म्हटल्याने भावजागृती होण्यास मदत होते. येथे भावजागृती हा उद्देश असल्याने असे केले आहे.

Leave a Comment