आरती वटसावित्रीची

अश्वपती पुसता झाला ।
नारद सांगताती तयाला ॥
अल्पायुषी सत्यवंत ।
सावित्रीनें कां प्रणीला ॥
आणखी वर वरी बाळें ।
मनि निश्चय जो केला ॥
आरती वडराजा ॥ १ ॥

दयावंत यमदूजा ।
सत्यवंत ही सावित्री ॥
भावें करीन मी पूजा ।
आरती वडराजा ॥ धृ. ॥

ज्येष्ठमास त्रयोदशी ।
करिती पूजन वडाशी ॥
त्रिरात्र व्रत करुनियां ॥
जिंकी तूं सत्यवंताशी ॥
आरती वडराजा ॥ २ ॥

स्वर्गावरी जाऊनियां ।
अग्निखांब कचळीला ॥
धर्मराज उचकला ।
हत्या घालील जीवाला ॥
येई गे पतीव्रते पती नेई गे आपुला ।
आरती वडराजा ॥ ३ ॥

जाऊनिया यमापाशीं ।
मागतसे आपल्या पती ॥
चारी वर देऊनिया ।
दयावंत द्यावा पती ।
आरती वडराजा ॥ ४ ॥

पतिव्रते तुझी कीर्ती ऎकूनि ज्या नारी ॥
तुझी व्रतें आचरती ।
तुझी भुवनें पावती ॥
आरती वडराजा ॥ ५ ॥

पतिव्रते तुझी स्तुती ।
त्रिभुवनी ज्या करिती ॥
स्वर्गी पुष्पवृष्टी करुनिया ।
आणिलासी आपला पती ।
अभय देऊनिया ।
पतिव्रते तारी त्यासी ॥
आरती वडराजा. ॥ ६ ॥