शनिचा मंत्र

शनीची दहा नावे

कोणस्थः पिङ्गलो बभ्रुः कृष्णो रौद्रोऽन्तको यमः ।
सौरिः शनैश्‍चरो मन्दः पिप्पलादेन संस्तुतः ॥

अर्थ : कोणस्थ, पिंगल, बभ्रु, कृष्ण, रौद्र, अंतक, यम, सौरि, शनैश्‍चर आणि मंद या दहा नावांनी पिप्पलाद ऋषींनी शनीची स्तुती केली आहे.

शनीचे स्तोत्र

पिप्पलाद उवाच ।

नमस्ते कोणसंस्थाय पिङ्गलाय नमोऽस्तु ते ।
नमस्ते बभ्रुरूपाय कृष्णाय च नमोऽस्तु ते ?॥ १ ॥

अर्थ : पिप्पलाद ऋषी म्हणाले, कोणस्थ, पिंगल, बभ्रु, आणि कृष्ण या नावांनी ओळखल्या जाणार्‍या शनिदेवाला माझा नमस्कार असो.

नमस्ते रौद्रदेहाय नमस्ते चान्तकाय च ।
नमस्ते यमसंज्ञाय नमस्ते सौरये विभो ?॥ २ ॥

अर्थ : रौद्र, अंतक, यम आणि सौरि ही नावे असलेल्या शनिदेवाला माझा नमस्कार असो.

नमस्ते मन्दसंज्ञाय शनैश्‍चर नमोऽस्तु ते ।
प्रसादं कुरु देवेश दीनस्य प्रणतस्य च ॥ ३ ॥

अर्थ : मंद आणि शनैश्‍चर ही नावे धारण केलेल्या शनिदेवाला माझा नमस्कार असो. हे देवाधिदेवा, या शरणागत दीनावर तू प्रसन्न हो.