काकनवाडा येथील श्री त्र्यंबकेश्वर

समस्त विश्व ब्रह्मांडाचे चालक भगवान श्री शिवशंकर हे आहेत. भागीरथाने जेव्हा आपल्या पूर्वजांना शापातून मुक्त करण्यासाठी उपाय विचारला तेव्हा स्वर्गेतून गंगेचे अवतरण पृथ्वीवर झाल्यास आणि त्या स्वर्गीय गंगेच्या पवित्र जलाने पूर्वचांच्या रक्षेवर क्षेपण केल्यास ते मुक्त होतील असे ऋषींनी भगीरथाला सांगितले होते. भगीरथाने त्याच्या पूर्ववर्ती वाडवडिलांपासून भगवान शिवशंकराची आराधना हिमालयात केली. प्रथम त्याने भगवान श्रीविष्णूची आराधना केली, त्याच्या तपश्चर्येने भगवान विष्णू प्रसन्न झाल्यावर भगीरथाने गंगेला पृथ्वीवर सोडण्याची विनंती प्रभूला केली.

तेव्हा गंगेचा तो प्रचंड ओघ पृथ्वी सांभाळू शकत नाही, त्याकरिता भगवान शंकराची आराधना करा व त्यांनाच गंगेला जटेत धारण करण्यास सांगा असे भगवंतांनी सांगितल्यावर भगीरथाने परमकरुणामय आणि सदोदित जीवांवर कृपा करीत राहणाऱ्या भगवान आशुतोष शिवशंकराची घनघोर अशी तपश्चर्या केली. राजा भगीरथाच्या तपश्चर्येवर प्रसन्न होवून शंकर प्रकट झालेत व त्यांनी वर मागण्यास सांगितले तेव्हा भगीरथाने गंगा आपल्या शिरावर धारण करा व पृथ्वीवर सोडा अशी प्रार्थना त्यांना केली.

कोणत्याही जीवावर अगदी राक्षसांवर सुद्धा प्रसन्न होवून त्यांना हवे ते वरदान देणारे केवळ भगवान शिव आहेत. ते केवळ भक्ताचा शुद्ध भाव पाहतात. मग तो कोणीही असो. भगवान शिवाला ज्ञानदाता असे म्हटले आहे आणि श्रीमद भगवद्गीतेत तर ज्ञानासारखे पवित्र दुसरे काहीच नाही असे म्हटले आहे. म्हणजेच भगवान शिवशंकराच्या चरणी समर्पित झाल्यासच मनुष्याला त्याच्या जीवाचे आणि जीवनाचे कल्याण करता येते.

आपल्या विदर्भातील अकोला व बुलडाणा जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या काकनवाडा या छोड्याशा खेड्यात श्री त्र्यंबकेश्वर संस्थान आहे. येथील शिवशक्त श्री. देशपांडे यांच्या घरातील अडीचशे वर्षापूर्वी एका पुरुषाने महान तपाचरण केले. त्यांच्या तपाचरणाने भगवान शिव संतुष्ट झाले व त्यांनी स्वप्नात दृष्टांत देऊन आपण येथे कामय निवास करणार आहोत तेव्हा माझी पुजा, लिंग स्थापन करून येथेच करावी अशी आज्ञा केली. या घटनेनंतर आज अडीचशे वर्षानंतर सुद्धा काकनवाडा येथे त्र्यंबकेश्वर संस्थान म्हणून हे देवालय कार्यरत आहे. देशपांडे घराण्यातील तो शिवभक्त दरवर्षी नाशिक जवळील श्री श्रेत्र त्र्यंबकेश्वर येथे पायी वारी करून तेथे तपाचरण करीत असे.

ह्या त्यांच्या उग्र तपाचरणामुळे व शुद्ध भावभक्तीमुळे आपल्या भक्ताला आशिष देण्यासाठी भगवान शिवाने येथे निवास केल्याचे त्या घराण्यातून सांगण्यात येते. गावातील जुने लोक सुद्धा या बाबत माहिती देतात. या श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे पायी वारी करून तेथे तपाचरण करीत असे.

ह्या त्यांच्या उग्र तपाचरणामुळे व शुद्ध भावभक्तीमुळे आपल्या भक्ताला आशिष देण्यासाठी भगवान शिवाने येथे निवास केल्याचे त्या घराण्यातून सांगण्यात येते. गावातील जुने लोक सुद्धा या बाबत माहिती देतात. या श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वराचा जीर्णोद्धार करण्याचे कार्य येथील मंडळाने हाती घेतले आहे. या मंदिरात पुढील प्रमाणे कार्यक्रम साजरे होत असतात.


श्रीत्र्यंबकेश्वराचे प्राचीन शिवालय येथे पहिले फक्त मारोतीचा पार होता. साक्षात्कारानंतर तेथे स्वयंभू शिवपिंड आल्यानंतर तेव्हाच्या गावकरी शिवभक्तांनी आपल्या इच्छाशक्तीच्या जोरावर हे शिवमंदिर उभारले होते. म्हणून तर म्हटले आहे….

भक्तीसाठी देवानं काकनवाडा पाहिलं


या शिवायलयात मारोतीची विशेषता ही की त्याच्या हाती गदा, पहाड अन्य काही नसून फक्त महादेवाची पिंड आहे. ती इतर कुठेही पाहायला मिळत नाही.

ही प्राचीन बाणगंगा नदी आता ह्या नावाने सर्वश्रृत आहे. या नदीच्या पाण्याने अनेक भाविक मंगलस्नान करून त्र्यंबकेश्वराला रुद्राभिषेक करतात. आता वान नदीवर धरण बांधल्यामुळे नदीला पाणी कमी प्रमाणात असते.

काकनवाडा : हे गाव अकोल्याच्या पश्चिमेस अकोला व बुलडाणा जिल्ह्याच्या सीमेवर पवित्र वान नदीच्या तिरावर वसलेले छोटेसे खेडे आहे. येथे जाण्याकरिता तेल्हारा, निंबा, वरवट, जळगांव, सोनाळा, संग्रामपूर, येथून वाहने व राज्य परिवहन मंडळाच्या बसेस आहेत. हे शिवाचे जागृत देवस्थान असून भाविकांनी या स्थळाला एकदा भेट देऊन शिवाशिषाची अनुभूती घ्यावी. येथे आपली मनोकामना पूर्ण होते अशी श्रद्धाळूंचे अनुभव आहेत.

Leave a Comment