सोमनाथ मंदिर

बारा ज्योतिर्लिंगांपैकी पहिले आणि अतीप्राचीन असे गुजरात राज्यातील हे शैवक्षेत्र ! पहिल्या शतकात सोमनाथाचे पहिले दगडी मंदिर बांधले गेले. हे मंदिर मोडकळीस आल्यानंतर वर्ष ६४९ मध्ये राजा धरसेन याने स्थापत्य आणि कला यांचा सुंदर मेळ घालून वैभवशाली असे दुसरे दगडी मंदिर बांधले. ८ व्या शतकात अरबांचे आक्रमण झाल्यानंतर वर्ष १०२५ मध्ये गझनीच्या महंमदाने या मंदिरावर आक्रमण केले. त्याने या शिवमंदिरातील अगणित संपत्ती लुटली. त्यानंतर अलाउद्दीन खिलजी, महंमद बेगडा आणि औरंगजेब यांच्या आक्रमणांमुळे हे मंदिर उद्ध्वस्त झाले. वर्ष १७८३ मध्ये पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी सोमनाथाचे नवे मंदिर उभारले, तर स्वातंत्र्यप्राप्तीनंतर १९५१ मध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुढाकारातून या मंदिराचा जिर्णोद्धार झाला ! या वेळी तत्कालीन राष्ट्रपती बाबू राजेंद्रप्रसाद यांच्या हस्ते शिवमूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली.

Leave a Comment