काशी विश्वेश्वर

बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले काशी (वाराणसी) हे सुप्रसिद्ध शैवक्षेत्र ! विश्वेश्वराचे मंदिर आणि गंगा नदीचे सान्निध्य असलेले हे तीर्थक्षेत्र ‘मोक्षनगरी’ म्हणून ओळखले जाते. अठराव्या शतकाच्या अखेरीस पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी सध्याचे मंदिर बांधले. हे मंदिर लहानसे असून मध्यभागी एका चौरस कुंडात विश्वेश्वराच्या लिंगाची स्थापना करण्यात आली आहे. एकोणिसाव्या शतकात पंजाबचा राजा रणजितसिंग याने या मंदिरावर सोन्याचा कळस चढवला.

काशी विश्वेश्वराच्या मंदिराला पुनर्वैभव प्राप्त करून देण्याची छ. शिवाजी महाराजांची आकांक्षा होती. ती पूर्ण करणे, हे प्रत्येक हिंदूचे कर्तव्य आहे !

Leave a Comment