श्री संत गोरा कुंभार (इ.स. १२६७ ते १३१७)

तेरेडोकी गावात गोरा कुंभार हा एक विठ्ठलभक्त होता.कुंभारकाम करत असताना देखीलतो पांडुरंगाच्याभजनात सदैवतल्लीन असे. पांडुरंगाच्या नामस्मरणात तो नेहमीमग्न असे.

एकदा त्याची पत्नी आपल्या एकुलत्या एका लहान मुलास अंगणातठेवूनपाणीआणण्यासाठीगेली.त्या वेळी गोरा कुंभार मडकीकरण्यास लागणारीमाती तुडवीतपांडुरंगाचे भजनकरीत होता. त्यात तो अगदी तल्लीन झाला होता. जवळच रांगत, खेळत असलेलं ते मूलतिकडेयेऊनआळ्यात पडले.त्या मातीत आले.गोरा कुंभारपायांनी मातीखालीवरकरीतहोता. मातीबरोबरत्याने आपल्यामुलालाहीतुडविले. पांडुरंगाच्याभजनात तो निमग्नअसल्यामुळेतुडविताना रडलेलेमूलही त्याला समजले नाही.

पाणी आणल्यावरत्याची पत्नी मुलास शोधू लागली.ते मूलतिला तिथे दिसले नाही, म्हणून ती गोरा कुंभाराकडे गेली.इतक्यात तिचीनजर चिखलाकडे गेली, तो चिखल रक्तानेलाल झालेला पाहून मूल तुडविले गेल्याचेतिच्या लक्षात आले.तिने हंबरडा फोडला, आक्रोशकेला. या नकळत झालेल्याकृत्याचे प्रायच्छित म्हणून गोरा कुंभारानेआपले दोन्ही हात तोडून घेतले. त्यामुळेत्याचा कुंभारकीचा धंदाबसला.विठ्ठल-रखुमाईमजूरबनूनत्याच्या घरी येऊनराहू लागले.त्याचा तोकुंभाराचा धंदा पुन्हा बहरला.

पुढे काहीदिवसांनीआषाढीएकादशी आली.श्री ज्ञानेश्वरव श्री नामदेवही संतमंडळीपंढरपुरासनिघाली.वाटेततेरेडोकीयेथेयेऊन श्री ज्ञानेश्वरांनीगोराकुंभार वत्याच्यापत्नीलापंढरपुरास आपल्याबरोबरआणले.

गरुड पारावर नामदेवांचे कीर्तन उभे राहिले. ज्ञानेश्वर आदिकरून सर्व संतमंडळी कीर्तन ऐकण्यास बसली. गोरा कुंभारसुद्धा आपल्या पत्नीसहकीर्तनास बसला.कीर्तनात लोकवर हात करूनटाळ्या वाजवू लागले.विठ्ठलाचागजर करूलागले; त्या वेळी गोरा कुंभारानेदेखील आपले थोटे हात अभावितपणेउचलले.तेव्हा त्या थोट्याहातांनाहात फुटले.ते पाहूनसंतमंडळींना आनंद झाला.पांडुरंगाचासर्वांनी जयजयकारकेला.

गोरा कुंभाराच्या पत्नीनेश्री विठ्ठलाचीकरुणा भाकली.''पंढरीनाथा,माझे मूलपतीच्यापायाखालीतुडविले गेले;मी मुलावाचूनदुःखीकष्टी झाले आहे. विठ्ठला, माझ्यावरदया कर. मला माझे मूल दे.''पंढरीनाथाने तिची विनवणी ऐकली. तीचे चिखलात तुडवून मेलेले मूल रांगत रांगत सभेतून तिच्या जवळ येतअसल्याचं तिन पाहिलं. त्या मुलाला तिनेजाऊनउचलूनकडेवर घेतले.संतमंडळींसह सर्वांनी आनंदानेटाळ्यांचागजर चालविला.