संस्कृत भाषेचा वारसा जतन करणारे रत्नागिरीतील गोगटे-जोगळेकर महाविद्यालय !

‘महाविद्यालयात गेली ६० वर्षे कालिदास व्याख्यानमाला सुरू आहे. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी प्रवेशाच्या वेळी ‘संस्कृत’ विषय घ्यावा, यासाठी ‘रत्नागिरी एज्युकेशन सोसायटी’च्या माध्यमिक शाळांमधून मुलांमध्ये त्या विषयाची आवड निर्माण केली जाते. यासाठी त्यांना विविध विषयाची स्तोत्रे शिकवली जातात.

संस्कृत विषय शिकवण्यासाठी शिक्षक तयार व्हावेत, यासाठी महाविद्यालयाने संस्कृतमधून पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू केला आहे. महाविद्यालयात संस्कृत भाषेतील नाटके सादर केली जातात. नुकतेच ‘रामायण’ या विषयावर संस्कृतमधून शिबीर घेण्यात आले. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकडून संस्कृतमधून वाद्यवृंदाचे प्रयोग महाराष्ट्रभर सादर केले जातात.’

– प्राचार्य डॉ. देव, गोगटे-जोगळेकर महाविद्यालय, रत्नागिरी.

Leave a Comment