राष्ट्रभक्ती निर्माण करणारे शिक्षण हवे !

         भारतात जे जे क्रांतीकारक झाले, जे संत झाले, जे देशभक्त स्वातंत्र्यासाठी लढले व त्यासाठी हुतात्मा झाले, जे शास्त्रज्ञ  झाले, जे समाजाच्या उन्नतीसाठीच जगले, ज्यांनी समाजाला उत्थानासाठी संघटना निर्माण करण्यासाठी जीवन दिले, त्या सर्वांचे पूर्ण चरित्र हे तरुण पिढीला, लहान मुलांना अभ्यासासाठी असलेच पाहिजे.

मुलांना सक्तीने २ वर्षे लष्करी शिक्षण असावे. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, समर्थ रामदास यांचे हे ग्रंथ विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी ठेवले पाहिजेत. क्रांतीकारक भगतसिंग, राजगुरु, सुखदेव, वासुदेव बळवंत फडके, चाफेकर व स्वा. सावरकर यांच्या सर्व कथा तरुणांसमोर आल्या पाहिजेत.

जीवन कसे शुद्ध आचरणाचे, प्रामाणिक, पारदर्शी व कष्ट आणि मेहनत करणारे व देशभक्तीपूर्ण असावे. देशासाठी जगणे व मरणे, याची प्रेरणा मिळेल, असेच शिक्षण हवे, तरच देश वैभवशाली होईल.’

– श्री. अनिल कांबळे (मासिक ‘लोकजागर’, अमरनाथ यात्रा विशेषांक २००८)

Leave a Comment