राष्ट्राभिमान जागृत करणार्‍या कृती करून खर्‍या अर्थाने प्रजासत्ताक दिन साजरा करूया !

राष्ट्राभिमान आणि राष्ट्रप्रेम जागृत करणार्‍या कृती अन् आदर्श प्रजासत्ताक राज्य येण्यासाठी करावयाच्या मागण्या या लेखात मांडल्या आहेत. तशा कृती केल्यानेच आदर्श प्रजासत्ताक राज्य येईल आणि तेव्हाच आपण खर्‍या अर्थाने आपण क्रांतीकारकांनी देशासाठी, पर्यायाने आपल्यासाठी केलेल्या बलीदानाचे पांग फेडू शकू.

विद्यार्थीमित्रांनो, आपण नागरिकशास्त्रात लोकशाहीची (लोकराज्याची) व्याख्या शिकलो आहोत. लोकांनी लोकांच्या कल्याणासाठी चालवलेले राज्य म्हणजे लोकशाही (लोकराज्य), म्हणजेच प्रजासत्ताक होय; पण मित्रांनो, खरेच सध्या लोकांचे राज्य आहे का ? नाही ना ? प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने या मागच्या कारणांचे आपण चिंतन करायला हवे.

‘राष्ट्राभिमानाचा अभाव’ हेच देशातील सर्व समस्यांमागील कारण

आज देशात अनेक समस्या आहेत. देशात भ्रष्टाचाराने थैमान घातले आहे. देशाच्या सीमाही सुरक्षित नाहीत. देशाची अशीच स्थिती राहिली, तर आपणा सर्वांचे अस्तित्व धोक्यात येईल. यासाठी आपण भावी देशाचे नागरिक या नात्याने याचा गांभीर्याने विचार करून उपाय शोधायला हवा, तरच उद्याचा भारत आदर्श आणि सुजलाम्-सुफलाम् होईल. मित्रांनो, मला असे वाटते की, यामागील मुख्य कारण आहे, आपणा सर्वांमध्ये असलेला राष्ट्राभिमानाचा अभाव. आम्ही आजपासून असा निर्धार करायला हवा की, मी प्रत्येक कृती ‘माझ्यात आणि इतरांमध्ये राष्ट्राभिमान जागृत होईल’, अशीच करीन.

सध्याच्या प्रजासत्ताकातील आणि आदर्श प्रजासत्ताकातील राज्यकर्ते

सध्याच्या प्रजासत्ताकातील राज्यकर्ते आदर्श प्रजासत्ताकातील राज्यकर्ते

१. विचार

स्वार्थी, स्वतःचा विचार करणारे

‘राष्ट्र हेच माझे कुटुंब आहे’, असा व्यापक आणि जनतेच्याकल्याणाचा विचार करणारे

२. लोकांना कायदेतात?

दुःख

आनंद

३. वृत्ती

अ.

खोटे बोलणारे

सत्य बोलणारे

आ.

अहंकारी

नम्र

इ.

भ्रष्टाचारी

तन, मन, धन आणि प्रसंगी प्राण यांचा त्याग करणारे

४. राष्ट्राभिमान

राष्ट्राभिमानशून्य

राष्ट्राभिमानी

५. देव आणि धर्म

न मानणारे

श्रद्धा असलेले

राष्ट्राभिमान जागृत करण्यासाठी करावयाच्या कृती

विद्यार्थीमित्रांनो, ही स्थिती पालटण्यासाठी खालील कृती करण्याचा आजच्या दिनी निश्चय करूया.

१. झेंड्याचा अवमान रोखणे

२. क्रांतीकारकांच्या चरित्रांचा अभ्यास करून त्यांची मूल्ये कृतीत आणणे

३. राष्ट्रभक्तीपर गीतांचे पाठांतर करणे आणि ती समूहाने गाणे

४. क्रांतीकारकांची घोषवाक्येआणि चित्रे घरी लावणे

५. आपले आदर्श म्हणून एका तरी क्रांतीकारकाचीनिवड करणे

६. मित्रांना वाढदिवसाला क्रांतीकारकांचे चित्र किंवा त्यासंदर्भातील छोटी माहिती पुस्तिका भेट म्हणून देणे

७. आपल्या शाळेत पूर्ण ‘वंदे मातरम्’ म्हणण्यास प्रवृत्त करणे

८. राष्ट्रगीताचा अवमान होत असल्यास तो रोखणे

९. क्रांतीकारकांच्या जीवनावर आधारित चर्चासत्रे घेणे

१०. प्रतिज्ञेप्रमाणे आचरण करणे

११. क्रांतीकारक आणि राष्ट्रभक्त यांच्या चित्रांचे प्रदर्शन आयोजित करणे

१२. क्रांतीकारकांची चित्रे रंगवण्याची स्पर्धा ठेवणे

१३. राष्ट्रभक्ती निर्माण करणारेच चित्रपट आणि मालिका पहाणे

मित्रांनो, आपण वरील प्रत्येक सूत्र कृतीत आणणे, हाच खरा प्रजासत्ताक होय. आपण प्रत्येक सूत्र कृतीत आणूया आणि आपल्या मित्रांना ती कृतीत आणण्यास भाग पाडूया.

राष्ट्रप्रेम जागृत करण्यासाठी आणि आदर्श प्रजासत्ताक राज्य येण्यासाठी करावयाच्या काही मागण्या

प्रजासत्ताकदिनाच्या निमित्ताने आपण एक विद्यार्थी म्हणून आपण काही मागण्या करूया. या मागण्या जर सध्याच्या राज्यकत्र्यांनी मान्य केल्या, तर प्रत्येकात राष्ट्रप्रेम जागृत होईल आणि लवकरच आदर्श प्रजासत्ताक राज्य येईल. या मागण्यांप्रमाणे आमच्या शिक्षणपद्धतीत पालट होवो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना !

अ. प्रजासत्ताकदिनी राष्ट्रध्वजाची होणारी विटंबना थांबवा.

आ. राष्ट्रीय शिक्षणात समानता हवी. आंतरराष्ट्रीय, केंद्रशासित आणि राज्य असे शिक्षणाचे तुकडे करून आमच्यातील राष्ट्रीयत्वाची भावना नष्ट करू नका.

इ. प्रत्येकाला मातृभाषेतूनच शिक्षण मिळायला हवे.

ई. आम्हाला सैनिकी शिक्षण द्या.

उ. आमच्यात राष्ट्रप्रेम निर्माण करणार्‍या आदर्श क्रांतीकारकांची अपकीर्ती होऊ देऊ नका.

ऊ. आमच्यातील संघभावना वाढावी; म्हणून जात, धर्म आणि पंथ यांवरून आमची वर्गवारी करू नका.

ए. प्रजासत्ताकदिन तिथीनुसार साजरा करा.

ऐ. आमच्यातील गुणवत्तेनुसार विद्यालयात प्रवेश द्या, आरक्षण नको.

ओ. सर्व शाळांमधून पूर्ण ‘वंदे मातरम्’ म्हणण्यास बंधनकारक करा.

औ. सर्व शाळांची प्रार्थना एकच हवी.

अं. शाळेचा गणवेष इंग्रजांच्या वेशाप्रमाणे, उदा. टाय, टी-शर्ट असा नको.

विद्यार्थीमित्रांनो, वरील सर्व सूत्रे कृतीत आणण्याचा आपण या प्रजासत्ताकदिनी निश्चय करूया.’

– श्री राजेंद्र पावसकर (गुरुजी),पनवेल