‘जय श्रीराम’ म्हटल्याने मिशनरी शाळेतील १० च्या वर्गातील सर्व विद्यार्थी निलंबित !

कारो जिल्ह्यातील गोमिया येथील लॉयोला मिशनरी शाळेच्या मुख्याध्यापकांनी इयत्ता १० वीच्या सर्व विद्यार्थ्यांना ‘जय श्रीराम’चा जयघोष केल्याच्या प्रकरणी २ दिवसांसाठी निलंबित केले. विश्‍व हिंदु परिषदेने या प्रकरणाचे अन्वेषण करून कारवाई करण्याची मागणी शिक्षण विभागाकडे केली आहे. Read more »

भारतात धर्मसत्ता आणि राजसत्ता एकत्र येऊन आदर्श राष्ट्र निर्माण करणे आवश्यक ! – जगद्गुरु रामराजेश्वर माऊली सरकार, विदर्भ रुक्मिणी पीठ, कौंडण्यपूर

धर्मसत्ता आणि राजसत्ता यांनी एकत्र येऊन आदर्श राष्ट्र निर्माण करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन कौंडण्यपूर येथील विदर्भ रुक्मिणी पिठाचे जगद्गुरु रामराजेश्वर माऊली सरकार यांनी केले. येथे हिंदु जनजागृती समितीने आयोजित केलेल्या प्रांतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनात बोलत होते. Read more »

बेंगळुरू (कर्नाटक) येथे धर्मांधांकडून मंदिरातील नागदेवतांच्या स्थानांची तिसर्‍यांदा तोडफोड !

येथील बापूजी नगरातील श्रीमुनेश्‍वर मंदिरावर धर्मांध मुसलमानांनी आक्रमण करून मंदिरालगत असलेल्या नागदेवतेसाठी बनवण्यात आलेल्या नागकट्ट्याची तोडफोड केली. ४ नागकट्ट्यांपैकी २ नागकट्टे संपूर्ण फोडून टाकण्यात आले असून अन्य २ नागकट्टे विद्रूप करण्यात आले आहेत. Read more »

मालवणी (मुंबई) येथे रामनवमीच्या शोभायात्रेत दंगल !

मुसलमानबहुल भाग असलेल्या येथील मालवणी येथे श्रीरामनवमीच्या दिवशी निघालेल्या शोभायात्रेत धर्मांधांनी दंगल घडवली. मालवणी गेट क्रमांक ५ येथे शोभायात्रा आल्यावर दंगलीला आरंभ झाला. येथे मोठ्या प्रमाणात घोषणा देण्यात आल्या, तसेच पादत्राणेही फेकण्यात आली. Read more »

कानपूर (उत्तरप्रदेश) येथे हिंदूंच्या धर्मांतराचा प्रयत्न करणार्‍यांना अटक !

कानपूर पोलिसांनी चांगली नोकरी, व्यवसाय, विवाह आदी आमिषे दाखवून गरीब हिंदूंचे ख्रिस्ती धर्मात धर्मांतर करण्याचा प्रयत्न करणार्‍या अभिजीत आणि रजत यांना येथील एका सदनिकेतून अटक केली. त्यांच्याकडे तैवानी भाषेत लिहिलेली पुस्तके सापडली आहेत. Read more »

प्रयागराज (उत्तरप्रदेश) येथे माघ मेळ्यामध्ये हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘हिंदु राष्ट्र संपर्क अभियान’ !

येथे चालू असलेल्या माघ मेळ्यामध्ये हिंदु जनजागृती समितीच्या वतीने हिंदु राष्ट्र संपर्क अभियान राबविण्यात आले. या अंतर्गत विविध संत, हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे प्रतिनिधी यांना संपर्क करून हिंदु राष्ट्राच्या कार्यात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले. Read more »

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना ‘भारतरत्न’ द्या – प्रवीण तोगाडिया, अध्‍यक्ष, आंतरराष्‍ट्रीय हिंदु परिषद

ज्‍यांनी रामभक्‍तांवर गोळ्‍या झाडल्‍या, त्‍यांना ‘पद्मविभूषण’ मिळाला आणि ज्‍यांनी गोळ्‍या झेलल्‍यामुळे भाजपचे सरकार आणि श्रीराममंदिर बनत आहे, त्‍यांच्‍या वाट्याला उपेक्षा आली आहे, अशी खंतही त्‍यांनी व्‍यक्‍त केली. Read more »

जिहादी प्रवृत्तीच्या दबावापुढे झुकून तेलंगाणातील सरकारकडून आमदार टी. राजासिंह यांना अटक – अधिवक्ता सुधीर वंदूरकर-जोशी, जिल्हामंत्री, विहिंप

टी. राजासिंह हे प्रखर हिंदुत्वनिष्ठ आमदार असल्यानेच त्यांना जिहादी प्रवृत्तीच्या दबावापुढे झुकून तेलंगाणातील के.सी.आर्. सरकारने कट रचून अटक केली. एकूणच तेलंगाणा सरकारची कृती ही पक्षपाती आहे. Read more »

भारताला ‘हिंदु राष्ट्र’ करण्यासाठी पाटलीपुत्र येथील हिंदुत्वनिष्ठ संघटनांची एकजूट – हिंदु आघाडी

भारतातील अनेक राज्यांमध्ये ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’च्या माध्यमातून भारताला इस्लामी राष्ट्र बनवण्याची सिद्धता चालू आहे. यासमवेतच हलाल अर्थव्यवस्थेच्या माध्यमातून हिंदु समाजाला बेरोजगार करण्याचे प्रयत्न होत आहेत. Read more »

धर्मांतरविरोधी कायदा देशभर लागू करून त्याची कठोर कार्यवाही करा – प्रबल प्रतापसिंह जुदेव, प्रदेशमंत्री, भाजप, छत्तीसगड

ख्रिस्ती मिशनर्‍यांनी मानवतेसाठी शाळा, रुग्णालये अवश्य उघडावीत; मात्र या सोयीसुविधांच्या नावाखाली ख्रिस्ती बनण्यासाठी हिंदूंचे धर्मांतर का ? शिक्षण आणि अन्य सेवा यांच्या नावाखाली व्यापार केला जात आहे. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​