मंदिरांतील सोने शासकीय योजनेत जमा करणे, हे भक्तांच्या श्रद्धांचे हनन ! – हिंदु जनजागृती समिती

केंद्रशासनाच्या सुवर्ण मुद्रीकरण योजनेत राज्यातील सरकारीकरण झालेल्या मुंबईतील सिद्धीविनायक मंदिराने ४० किलो सोने, तर शिर्डीतील साई संस्थानने २०० किलो सोने गुंतवण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय म्हणजे देवनिधीचा अयोग्य वापरच ! Read more »

देवतांच्या चित्रांच्या टाईल्स काढण्यासाठी नगरपालिका आणि तहसील कार्यालय यांना निवेदन सादर

येथील नगरपालिकेच्या अखत्यारित असलेल्या महाराष्ट्र बँकेच्या इमारतीच्या जिन्यामध्ये देवतांचे चित्र असलेल्या टाईल्स लावण्यात आल्या होत्या. हे पाहून हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांनी बँकेच्या व्यवस्थापकांचे प्रबोधन केले आणि नगरपालिका अन् तहसील कार्यालय यांना निवेदनही दिले.
Read more »

आदिवासी विद्यार्थ्यांचे धर्मांतर करणार्‍या ख्रिस्ती मिशनर्‍यांना शिवसेनेने खडसवले !

डहाणूच्या जंगलपट्टीतील नागझरी-डोंगरीपाडा या दुर्गम भागात लायोला माध्यमिक आश्रम शाळा असून, शासकीय अनुदान मिळणारी ही शाळा ख्रिस्ती मिशनरीमार्फत चालवली जाते. येथे सुरू असलेले धर्मांतर शिवसेनेच्या प्रयत्नांमूळे बंद झाले. Read more »

३१ डिसेंबरला होणारे अपप्रकार रोखण्यासाठी नांदेड येथे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

३१ डिसेंबर निमित्त सार्वजनिक स्थळी होणारे अपप्रकार रोखण्यासाठी प्रशासन आणि पोलीस यंत्रणेकडून व्यवस्था व्हावी आणि अशा अपप्रकारांना प्रतिबंध व्हावा, यासाठी नांदेड येथे निवेदनांतून जिल्हाधिकार्‍यांना हिंदु जनजागृती समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले.

Read more »

‘बाजीराव-मस्तानी’ चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी !

अमरावती येथील आंदोलनाच्या वेळी आपले मत व्यक्त करतांना छावा संघटना आणि भगवा सेना यांचे श्री. नितीन व्यास यांनी त्यांचे विचार मांडतांना सांगितले, “अशा प्रकारे इतिहासाचे विकृतीकरण करणे अतिशय अयोग्य आहे. हा चित्रपट आम्ही हिंदू एकत्रित येऊन बंद करूच.” Read more »

धुळे येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन संपन्न

बाजीराव मस्तानी चित्रपटातील पिंगा पिंगा या गाण्यात बाजीराव यांच्या पत्नी काशीबाई आणि मस्तानी यांना अंगविक्षेप करत नाचतांना दाखवले आहे. संजय लीला भन्साळी यांनी इतिहासाचा अभ्यास केलेला दिसत नाही.
Read more »

३१ डिसेंबरच्या निमित्ताने होणारे अपप्रकार रोखण्यासाठी नाशिक येथे निवेदन

३१ डिसेंबरच्या निमित्ताने होणारे अपप्रकार रोखण्यासाठी कठोर पावले उचलावीत, या मागणीसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने नाशिक येथे गंगापूर रोड पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक श्री. रमेश यादव यांना निवेदन देण्यात आले. Read more »

बाजीराव-मस्तानी चित्रपटाद्वारे होणारे इतिहासाचे विकृतीकरण रोखण्याची हिंदुत्ववाद्यांची मागणी

बाजीराव-मस्तानी चित्रपटाद्वारे होणारे इतिहासाचे विकृतीकरण आणि तेलंगण शासन ख्रिस्ती धर्मियांचे करीत असलेले लांगूलचालन यांविरोधात येथे जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले. Read more »

एन्.सी.ई.आर.टी.च्या चुकीच्या इतिहासाविषयी शासनाने तातडीने लक्ष घालावे ! – पू. सुनील चिंचोलकर, ज्येष्ठ समर्थभक्त

ज्या पुस्तकांत संतांचा एकेरी आणि चुकीचा उल्लेख आहे, ज्या पुस्तकात समर्थ रामदासस्वामी यांचे नाव नाही, अशा पुस्तकांतून विद्यार्थ्यांनी काय शिक्षण घ्यायचे ? राष्ट्रभाषेतील पुस्तक लक्षावधी विद्यार्थ्यांकडे जाते. त्यामुळे असा चुकीचा इतिहास शिकवल्यास हेच विद्यार्थी पुढे स्पर्धा परीक्षांसाठी बसल्यावर ते उत्तीर्ण कसे होतील ? Read more »

भाजप कार्यकत्यांच्या बाजीराव मस्तानी चित्रपट विरोधाला माझा पाठिंबा ! – आमदार सौ. मेधा कुलकर्णी

संजय लीला भन्साळी दिग्दर्शित केलेल्या बाजीराव मस्तानी या चित्रपटातील दोन गाण्याविषयी महाराष्ट्र विधानमंडळातील काही आमदारांनी आक्षेप घेतला आहे. शिवसेनेने या चित्रपटाच्या विरोधात रस्त्यावर उतरू, असे म्हटले आहे. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​