इस्रायलने आतंकवादी संघटना ‘हमास’च्या वरिष्ठ नेत्याचे घर केले उद्ध्वस्त !

इस्रायलच्या सैन्याने गाझा पट्टी येथील हमास या आतंकवादी संघटनेच्या वरिष्ठ नेत्याच्या घरावर आक्रमण करून ते उद्ध्वस्त केले.  येहियेह सिनवार असे त्याचे नाव आहे. इस्रायलच्या आक्रमणात आतापर्यंत हमासचे २० आतंकवादी ठार झाल्याचे सांगण्यात येत आहे, तर इस्रायलच्या म्हणण्यानुसार ही संख्या त्याहून अधिक आहे. Read more »

(म्हणे) ‘३ कोटी ३० लाख देवता; मात्र ऑक्सिजनचे उत्पादन करू शकत नाहीत !’

फ्रान्सच्या ‘शार्ली हेब्दो’ नियतकालिकाने आता हिंदूंच्या देवतांना भारतातील कोरोना रुग्णांचा ऑक्सिजनअभावी होणार्‍या मृत्यूसाठी उत्तरदायी ठरवण्याचा प्रयत्न केला आहे. Read more »

पॅलेस्टाईनकडून इस्रायलवर १३० क्षेपणास्त्रांद्वारे आक्रमण

पॅलेस्टाईनने केलेल्या रॉकेट आक्रमणानंतर इस्रायलने त्याला प्रत्युत्तर देत गाझापट्टीवर आक्रमण केले होते. त्यानंतर आता पॅलेस्टाईनच्या हमासने इस्रालयवर पुन्हा क्षेपणास्त्रांद्वारे आक्रमण केले. Read more »

इस्रायलने प्रत्युत्तरादाखल केलेल्या आक्रमणात २० पॅलेस्टिनी नागरिक ठार

इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांनी एकमेकांवर आक्रमण चालू केले आहे. १० मे या दिवशी ‘हमास’ने इस्रायलच्या दिशेने १०० क्षेपणास्त्रे डागली होती. याला इस्रायलने दिलेल्या प्रत्युत्तरात पॅलेस्टाईनचे २० नागरिक ठार झाले आहेत, तर ६५ हून अधिक जण घायाळ झाले आहेत. Read more »

नेपाळमधील ओली सरकार कोसळले !

नेपाळचे पंतप्रधान के.पी. शर्मा ओली हे संसदेत बहुमत सिद्ध करण्यात अपयशी ठरल्याने त्यांचे सरकार कोसळले. ओली यांना २३२ पैकी केवळ ९३ मते पडली, तर १२४ मते त्यांच्या विरोधात पडली. मतदानाच्या वेळी १५ खासदार तटस्थ, तर ३५ खासदार अनुपस्थित राहिले. Read more »

एकच गोळी घेऊन कोरोना दूर करणार्‍या गोळीची फायझर आस्थापनाकडून चाचणी

औषध निर्मिती करणार्‍या फायझर आस्थापनाने कोरोना प्रतिबंधात्मक लस बनवल्यानंतर आता कोरोना झाल्यावर त्याच्यावर उपचार करण्यासाठी गोळी बनवली असून त्याची चाचणी सध्या चालू आहे. Read more »

श्रीलंकेमध्ये राष्ट्रीय सुरक्षेला धोका असल्याने सार्वजनिक ठिकाणी बुरखा घालण्यावर बंदी !

श्रीलंकेच्या मंत्रीमंडळाने देशात सार्वजनिक ठिकाणी बुरखा घालण्यावर बंदी घालण्याचा प्रस्ताव संमत केला आहे. राष्ट्रीय सुरक्षेला धोका असल्याने ही बंदी घालण्यात आल्याचे सरकारने म्हटले आहे. Read more »

आम्ही भारतीय आणि तेथील आरोग्य कर्मचारी यांच्यासाठी अतिरिक्त साहाय्य पाठवणार ! – अमेरिकेला उपरती

लवकरच आम्ही भारतातील नागरिक आणि तेथील आरोग्य कर्मचारी यांच्यासाठी अतिरिक्त साहाय्य पाठवणार आहोत, असे वक्तव्य अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँटनी ब्लिंकेन यांनी केले आहे. Read more »

आफ्रिकेतील नायजर देशात जिहादी आतंकवाद्यांच्या आक्रमणात १३७ जणांचा मृत्यू

आफ्रिका खंडातील नायजर देशातील पश्‍चिम भागात जिहादी आतंकवाद्यांनी ३ घंटे केलेल्या गोळीबारात १३७ जणांचा मृत्यू झाला. आतंकवाद्यांनी अनेक घरांनाही आग लावली. Read more »

बांगलादेशमध्ये हिंदूंची घरे आणि मंदिरे यांवर आक्रमणासाठी चिथावणी देणार्‍या धर्मांधाला अटक

अशा धर्मांधांची केवळ अटक होणे पुरेसे नसून त्यांना कठोर शिक्षा होण्यासाठी भारत सरकारने बांगलेदश सरकारवर दबाव आणणे आवश्यक ! Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​