Menu Close

बांगलादेशात महंमद पैगंबर यांचा कथित अवमान केल्यावरून हिंदु विद्यार्थ्याला अमानुष मारहाण

विद्यार्थी रुग्णालयात भरती; प्रकृती चिंताजनक

स्वतःच्या धार्मिक भावना दुखावणार्‍यांच्या विरोधात कायदा हातात घेणारे हिंदूंच्या धार्मिक भावना मात्र सर्रास दुखावत असतात, हे लक्षात घ्या ! – संपादक 

ढाका (बांगलादेश) – वंंगबंधू शेख मुजीबूर रहमान विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्यापीठ येथे शिकणारा हिंदु विद्यार्थी उत्सब कुमार ज्ञान याच्यावर महंमद पैगंबर यांचा अवमान केल्याचा आरोप करत त्याला विद्यापिठातील मुसलमान विद्यार्थ्यांकडून अमानुष मारहाण करण्यात आली. यामुळे त्याला रुग्णालयात भरती करण्यात आले. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे. ही घटना २६ मे या दिवशी येथे घडली. उत्सब याने सामाजिक माध्यमांतून पैगंबर यांचा अवमान करणारी पोस्ट प्रसारित केल्याचा आरोप आहे. त्याला विद्यापिठातून बडतर्फ करण्याची मागणी केली जात आहे.

उत्सब याला मारहाण केल्यानंतर त्याच्याकडून अवमान केल्याचा कबुलीजबाब बलपूर्वक लिहून घेण्यात आला. उत्सब याने तो लिहून दिल्यावर त्याला पुन्हा मारहाण करण्यात आली. त्यानंतर त्याला पोलिसांच्या कह्यात देण्यात आले. पोलिसांनी त्याला येथील रुग्णालयात भरती केले. त्याची प्रकृती बरी झाल्यावर त्याची चौकशी करण्यात येईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

स्त्रोत: दैनिक सनातन प्रभात 

Related News