Menu Close

संबलपूर (ओडिशा) येथे हिंदूंच्या दुचाकी फेरीवर मशिदीजवळ धर्मांध मुसलमानांकडून आक्रमण

अशा घटना कायमच्या रोखण्यासाठी हिंदु राष्ट्राला पर्याय नाही ! – संपादक

संबलपूर (ओडिशा) – येथे १२ एप्रिल या दिवशी हनुमान जयंती समन्वय समिती आणि बजरंग दल यांनी दुचाकी फेरी काढली होती. ही फेरी धनुपाली भागातील मशिदीजवळ पोचली असता फेरीवर दगडफेक करण्यात आली. त्यानंतर येथे हिंसाचार चालू झाला. या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या हिंसाचारानंतर येथे इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. तसेच हिंदूंकडून १४ एप्रिल या दिवशी बंदचे आवाहन करण्यात आले होते.

या फेरीमध्ये १ सहस्र दुचाकीधारक सहभागी झाले होते. ते ‘जय श्रीराम’ आणि ‘जय बजरंग बली’ अशा घोषणा देत असतांना मशिदीजवळ २०० धर्मांध मुसलमानांनी त्यांच्यावर आक्रमण करत शिवीगाळ केली. तसेच लोखंडी सळ्या, लाठ्या आणि तलवारी यांद्वारे आक्रमण केले. या वेळी ते ‘कापून टाकू’, ‘परत भारतात जाऊ देणार नाही’, असे म्हणत होते.

स्रोत: दैनिक सनातन प्रभात

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *