Menu Close

हिंदीपेक्षा इंग्रजी अधिक मौल्यवान ! – तमिळनाडूचे शिक्षणमंत्री

 

चेन्नई (तमिळनाडू) – हिंदी भाषेपेक्षा इंग्रजी भाषा अधिक मौल्यवान आहे. त्यामुळे हिंदी ही ऐच्छिक असावी; परंतु अनिवार्य नसावी. जे हिंदी बोलतात, ते क्षुल्लक नोकर्‍यांमध्ये गुंतलेले आहेत. हिंदी बोलणारे लोक आमच्याकडे पाणीपुरी विकतात, असे संतापजनक विधान तमिळनाडूचे शिक्षणमंत्री पोनमुडी यांनी केलेे. कोईंबतूर येथील भारथिअर विद्यापिठाच्या दीक्षांत समारंभात ते बोलत होते.

पोनमुडी पुढे म्हणाले की, इंग्रजी ही आंतरराष्ट्रीय भाषा अगोदरपासून शिकवली जात असतांना हिंदी का शिकावी ? तमिळनाडू भारतातील शिक्षणव्यवस्थेत आघाडीवर आहे. तमिळ विद्यार्थी कोणतीही भाषा शिकण्यास सिद्ध आहेत.

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *