परभणी – दळणवळण बंदी लागू असतांना १७ एप्रिल या दिवशी सेलू येथील फुलेनगर भागातील खाजाखान पठाण यांच्या घरात सामूहिक नमाजपठण केल्याच्या प्रकरणी १८ जणांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. (दळणवळण बंदी असूनही एकत्र जमणारे स्वतःसमवेत इतरांचाही जीव धोक्यात घालत आहेत ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) थारकर यांनी सेलू पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून जिल्हाधिकार्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी हा गुन्हा नोंद झाला आहे. नमाजपठणात सहभागी सहा अल्पवयिनांना नातेवाइकांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.