Menu Close

‘मोदी पंतप्रधान असेपर्यंत काश्मीरचा प्रश्‍न सुटणार नाही !’ – पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान

अखंड काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे आणि पाकव्याप्त काश्मीर परत मिळवल्यानंतर हा प्रश्‍न कायमचा निकाली निघणार आहे. त्यासाठी ‘पंतप्रधान मोदी यांनी प्रयत्न करावेत आणि पाकला धडा शिकवावा,’ असेच जनतेला वाटते !

इस्लामाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील भाजप सरकार आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे नाझी विचारांचे अनुकरण करत आहे. (चोराच्या उलट्या बोंबा ! गेली ७ दशके पाकिस्तान तेथील हिंदूंचा वंशसंहार करत आहे, ते नाझीपेक्षाही अधिक अमानुष आहे. याविषयी इम्रान खान का बोलत नाहीत ? भारतात मोदी असे असते, तर येथील अल्पसंख्यांक शिल्लक राहिले असते का ? – संपादक) त्यामुळे नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान असेपर्यंत काश्मीर प्रश्‍नावर तोडगा निघण्याची शक्यता नाही, असे विधान पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी केले आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बेालत होते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *