
नवी देहली : रामजन्मभूमीविषयीच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर आता फेरविचार याचिकेची आवश्यकता नाही. हा वाद आता मिटला पाहिजे, असे देहलीच्या जामा मशिदीचे शाही इमाम अहमद बुखारी यांनी प्रतिक्रिया व्यक्त करतांना म्हटले आहे.
पुनर्विचार याचिका करणार नाही ! – सुन्नी वक्फ बोर्ड
रामजन्मभूमी खटल्यात पक्षकार असलेल्या सुन्नी वक्फ बोर्डाचे अध्यक्ष जफर फारूखी यांनी पुनर्विचार याचिका प्रविष्ट करण्यात येणार नाही, असे स्पष्ट केले आहे. तसेच एम्आयएम्चे खासदार असदुद्दीन ओवैसी हे बोर्डाचे सदस्य नाहीत. अन्य कोणी पुनर्विचार याचिकेची भाषा करत असेल, तर त्याचा सुन्नी वक्फ बोर्डाशी काहीही संबंध नाही, असेही फारूखी यांनी स्पष्ट केले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात







