Menu Close

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी श्री मरीआई देवस्थान, पांगारवाडी (जालगाव) येथे धर्मप्रेमींचे साकडे !

सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या ७६ व्या जन्मोत्सवानिमित्त ‘हिंदु राष्ट्र जागृती अभियान’

जालगाव (दापोली) : सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या ७६ व्या जन्मोत्सवानिमित्त त्यांना दिर्घायुष्य लाभावे आणि हिंदु राष्ट्राची स्थापना व्हावी, यासाठी १४ मे २०१८ ला सायंकाळी ७.३० वाजता श्री मरीआई देवस्थान, पांगारवाडी (जालगाव) येथे धर्मप्रेमींच्या वतीने साकडे घालण्यात आले.

प्रारंभी छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर हिंदु विधीज्ञ परिषदेच्या अधिवक्त्या सौ. अपर्णा कुलकर्णी यांनी साकडे घालण्यामागील उद्देश सांगितला.

या वेळी जालगावचे अध्यक्ष श्री. रामचंद्र कदम, पंचायत समिती सदस्य आणि पांगारवाडी अध्यक्ष श्री. मनोज भांबीड, ग्रामपंचायत सदस्य, पांगारवाडी उपाध्यक्ष श्री. राजेंद्र चोरगे आणि अन्य धर्मप्रेमी उपस्थित होते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *