Menu Close

राई गाव, भाईंदर (जिल्हा ठाणे) येथेे हिंदु राष्ट्रजागृती सभा

हिंदूंनो, धर्मपालन करून धर्मरक्षणासाठी एक व्हा ! – सतीश कोचरेकर, हिंदु जनजागृती समिती

भाईंदर (जिल्हा ठाणे) : हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांचे जगभर कार्य चालू आहे ते केवळ अन् केवळ सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले यांच्या प्रेरणेनेच ! आम्ही सर्वजण केवळ माध्यम आहोत. सध्याच्या काळात हिंदूंनी धर्मपालन करून धर्मरक्षणासाठी एक व्हायला हवे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांप्रमाणे आपण हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी संघटित होऊया, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे श्री. सतीश कोचरेकर यांनी केले. परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त ‘हिंदु राष्ट्रजागृती अभियाना’च्या अंतर्गत येथील राई गावातील श्रीराम मंदिराच्या पटांगणात ५ मे या दिवशी हिंदु राष्ट्रजागृती सभा घेण्यात आली. त्या वेळी ते सभेत ते बोलत होते.

भाईंदर (प.) येथील श्री गणेश मंदिराचे पुजारी श्री. दत्तात्रय भटगुरुजी या वेळी व्यासपिठावर उपस्थित होते. त्यांनीही उपस्थित धर्मबांधवांचे प्रबोधन केले. सभेच्या प्रारंभी येथील श्रीराम मंदिराचे पुजारी श्री. कृष्णकांत पंडितगुरुजी यांनी शंखनाद केला. त्यानंतर समितीचे कार्य आणि परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले यांचे कार्य यांविषयीच्या ध्वनीचित्रचकत्या उपस्थितांना दाखवण्यात आल्या. सभेची सांगता हिंदु राष्ट्र स्थापनेच्या प्रतिज्ञेने झाली. भाईंदर येथील राई, मुर्धा आणि मोर्वा गावांतील ग्रामस्थ सभेला उपस्थित होते.

अभिप्राय

श्री. भगवान पाटील, अध्यक्ष, राई गावपंच मंडळ – आजच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्याची संधी आम्हाला दिली, त्यासाठी मी आणि राई ग्रामस्थ आपले अत्यंत आभारी आहोत. अशाच सभांचे आयोजन आमच्याकडे यापुढेही करावे, ही आपणास नम्र विनंती !

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *