
नाशिक – काश्मीरमध्ये देशविरोधी कृत्ये वाढतच आहेत. सैनिकांवर दगडफेक केली जाते. असेच चालू राहिल्यास काश्मीरमधून सैनिकच हद्दपार होऊ शकतात. या वाढत्या प्रकारांमुळे त्यांचे मनोबल खच्ची होत आहे. सैनिकांवर होणारी दगडफेक रोखण्यासाठी त्यांना सर्वाधिकार देऊन दगडफेक करणार्यांच्या विरोधात गुन्हे प्रविष्ट करावेत, या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ठिकाणी राष्ट्रीय हिंदू आंदोलन करण्यात आले. आंदोलनानंतर या संदर्भातील निवेदनही उपजिल्हाधिकार्यांना संघटनेच्या वतीने देण्यात आले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात


