Menu Close

मालडा (बंगाल) जिल्ह्यात भारतीय कायदे कुणीच मानत नाहीत ! – भाजपचे बंगाल येथील नेते भट्टाचार्य

bjp_leader_bhattacharya
भाजपचे बंगाल येथील नेते भट्टाचार्य

कोलकाता : मालडा येथील हिंसाचारानंतर आता राज्य पातळीवर तसेच केंद्रीय पातळीवरही तेथील परिस्थितीसंदर्भात चौकशी होत आहे. हा हिंसाचार रोखण्यात प्रशासनाला पूर्णतः अपयश आल्याने या घटनेचे खापर त्यांच्यावर फोडण्यात येत आहेे; पण मालडा हे गेल्या १५ वर्षांपासून देशद्रोही घटना घडण्यासंदर्भात कुप्रसिद्ध आहे. तेथे मोठ्या प्रमाणात बनावट चलनाची तसेच मानवी तस्करी केली जाते. मालडा हा मुसलमानबहुल जिल्हा असून मुसलमानांची संख्या ५१ टक्के आहे. तर हिंदूंची लोकसंख्या केवळ ३० टक्के आहे. (आज भारतात अनेक जिल्हे, गावे अशी आहेत की, जेथे मुसलमानांची संख्या ही हिंदूंपेक्षा अधिक आहे; पण तरीही त्या ठिकाणी अल्पसंख्य असल्याच्या नावाखाली मुसलमानांनाच सुविधा मिळतात आणि हिंदु मात्र जीव मुठीत धरून आयुष्य कंठतात. – संपादक, दैनिक सनातन प्रभात ) तेथे राज्यशासनाला तसेच भारतीय कायद्यांना कुणीही जुमानत नाही, अशी अत्यंत धोकादायक माहिती भाजपचे बंगाल येथील नेते भट्टाचार्य यांनी दिली. (आधीच धर्माच्या नावावर पाक आणि बांगलादेश भारतापासून विभक्त झाला. आता असे आणखी किती जिल्हे भारतापासून विलग होण्याची भारतीय राज्यकर्ते वाट पहात आहेत ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात )

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *