Menu Close

मंदिरांचा पैसा धार्मिक कार्यासाठीच खर्च करण्याची मुख्यमंत्री विजय जोसेफ यांची घोषणा

मंदिरांच्या २४६ कोटी रुपयांतून बांधण्यात येणारे व्यावसायिक संकुलांचे प्रकल्प रहित !

चेन्नई (तमिळनाडू) – तमिळनाडूचे मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांच्या सरकारने मंदिरांचे ४६ प्रकल्प रहित केले आहेत. या प्रकल्पांना मागील स्टालिन सरकारच्या काळात संमती देण्यात आली होती. सरकारने म्हटले की, मंदिरांच्या स्थावर आणि जंगम  मालमत्तेचा वापर केवळ धार्मिक अन् मंदिरांशी संबंधित पवित्र कार्यांसाठीच केला जाईल.

सरकारी आदेशात म्हटले आहे की, मागील द्रमुक (द्रविड मुन्नेत्र कळघम् – द्रविड प्रगती संघ) सरकारने मंदिरांच्या पैशांतून विवाहासाठीचे २९ सभागृह आणि १७ व्यावसायिक संकुल बांधण्यास संमती दिली होती. या प्रकल्पांवर अनुमाने २४६ कोटी खर्च होणार होते; मात्र अद्याप या कामांना प्रारंभ झाला  नव्हता. यामुळेच मंदिरांची आर्थिक स्थिती पहाता त्यांची संमती रहित करण्यात आली आहे.

राज्यात गेल्या अनेक वर्षांपासून हिंदु धार्मिक आणि धर्मादाय देणगी विभागांतर्गत येणार्‍या मंदिरांच्या उत्पन्नाचा वापर विवाहासाठी सभागृह बांधणे, व्यावसायिक संकुल बांधणे आणि शैक्षणिक संस्था उभारणे, यांसाठी केला जात आहे; मात्र अनेक हिंदुत्वनिष्ठ संघटना याला विरोध करत होते. त्यांचे म्हणणे होते की, मंदिरांचे उत्पन्न केवळ मंदिरांची देखभाल, पूजा-पाठ आणि धार्मिक कार्य यांवरच खर्च व्हायला हवे.

तमिळनाडू सरकारप्रमाणे मंदिरांचा पैसा धार्मिक कार्यासाठी खर्च करण्याचा निर्णय देशातील प्रत्येक सरकारने घेणे आवश्यक आहे ! हिंदुत्वनिष्ठ सरकारांनी तो सर्वप्रथम घ्यायला हवा, असेच हिंदूंना वाटते ! – संपादक, हिंदु जनजागृती समिती

Read more on Free Hindu Temples

Latest News