Menu Close

गोरक्षा आणि गोमातेला राष्ट्रमाता घोषित करण्यासाठी भारतभर गोरक्षकांकडून ‘गो सन्मान आवाहन अभियान’

गोमातेला ‘राष्ट्रमाता’ म्हणून मान्यता द्या ! – प्रशासनाला निवेदन

देशभरात गोसंवर्धन आणि गोसंरक्षणासाठी जनजागृती करण्याच्या उद्देशाने चालू करण्यात आलेल्या गो सन्मान आवाहन अभियानाच्या अंतर्गत महाराष्ट्रातील विविध तहसीलदारांना सविस्तर निवेदन देण्यात आले आहे. ‘गो सन्मान आवाहन अभियाना’च्या अंतर्गत महाराष्ट्र राज्यात गोवंशियांचे संरक्षण, संवर्धन आणि गोहत्यच्या विरोधात कठोर कारवाई करा !’, अशी मागणी या निवेदनाद्वारे केली आहे. हे निवेदन राष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यपाल, तसेच राज्याचे मुख्यमंत्री यांना देण्यात आले.

या निवेदनात म्हटले आहे की,

१. भारतीय संस्कृतीतील गोमातेचे महत्त्व अधोरेखित करत केंद्रशासनाने ठोस धोरणात्मक पावले उचलावीत, अशी मागणी करण्यात आली आहे. भारतीय संस्कृतीत गोमाता ही श्रद्धेचे आणि जीवनपद्धतीचे केंद्र मानली जाते. ग्रामीण अर्थव्यवस्था, शेती आणि पर्यावरणीय संतुलन यामध्ये गायींचे महत्त्व अनन्यसाधारण असल्याचे सांगण्यात आले आहे.

२. सध्याच्या काळात भूजल, प्रदूषण, कत्तल आणि अन्य कारणांमुळे गोवंशियांवर संकट निर्माण होत असून त्यांचे संरक्षण करण्यासाठी एकसमान राष्ट्रीय धोरणाची आवश्यकता आहे. तसेच भारतीय संविधानातील कलम ४८ नुसार राज्याने गोवंशियांच्या संरक्षणासाठी आवश्यक पावले उचलावीत.

३. या पार्श्वभूमीवर देशभरात गोसंवर्धनासाठी प्रभावी उपाययोजना राबवणे, गोवंश कत्तल प्रतिबंधासाठी कठोर कार्यवाही करणे आणि गोसंरक्षणाला कायदेशीर बळ देणे, या प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत. गोवंशाला कायदेशीर व्यक्ती दर्जा देण्याचा विचार करावा, तसेच गोसंवर्धन आणि संरक्षणासाठी स्वतंत्र केंद्रीय गोवंश मंत्रालय स्थापन करण्याची मागणीही करण्यात आली आहे. यामुळे देशभरात एकसमान धोरण राबवणे सुलभ होईल आणि गोवंशियांचे संरक्षण अधिक प्रभावीपणे करता येईल.

४. या अभियानामध्ये संत समाज, गोभक्त आणि विविध सामाजिक संघटनांचा सहभाग असल्याचे नमूद करण्यात आले आहे. देशातील सर्व नागरिकांनी या अभियानात सहभागी होऊन गोसंरक्षणाच्या कार्याला पाठिंबा द्यावा.

गोवा येथे उपजिल्हाधिकार्‍यांना गोमाताप्रेमींकडून निवेदनाद्वारे मागणी

डिचोली – भारतात गोहत्या बंदी करावी, गोमातेचे संरक्षण व्हावे, गोमातेला राष्ट्रमाता संबोधित करावे यांसाठी भारतभर गोरक्षकांच्या वतीने ‘गो सम्मान आवाहन अभियान’ राबवले जात आहे. या अभियानाच्या अंतर्गत २७ एप्रिल आणि २७ जुलै या दिवशी भारत सरकारला निवेदन दिले जाणार आहे. माननीय राष्ट्रपती, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांना निवेदने दिली जाणार आहेत. गोव्यात २७ एप्रिल या दिवशी फोंडा आणि डिचोली येथे गोप्रेमींनी उपजिल्हाधिकार्‍यांना निवेदन दिले. डिचोली येथे उपजिल्हाधिकारी शुभम् नाईक यांना निवेदन देण्यात आले. या वेळी मये येथील गोशाळेचे संचालक श्री. कमलाकांत तारी, उद्योजक श्री. रमाकांत शेट्ये आदी उपस्थित होते.

फोंडा येथे श्री झरेश्वर देवस्थान ते उपजिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत गोप्रेमींनी ढोल ताशांच्या गजरात २ गोवंशियांची मिरवणूक काढली आणि त्यानंतर उपजिल्हाधिकारी कौशिक आमोणकर यांना निवेदन देण्यात आले.

सिंधुदुर्ग

वेंगुर्ला – ‘गो सम्मान आव्हान अभियाना’च्या अंतर्गत तालुक्यातील गोपालक आणि गोप्रेमी यांनी २७ एप्रिलला तहसीलदार ओंकार ओतारी यांना निवेदन दिले. या वेळी बाबूराव खवणेकर, गिरीश फाटक, प्रसन्ना देसाई, सुहास गवंडळकर, अधिवक्त्या सुषमा प्रभुखानोलकर, दिना आचार्य, गौरी मराठे, नितीन लिंगोजी यांच्यासह गोप्रेमी उपस्थित होते. या अभियानाचा उद्देश सांगतांना बाबूराव खवणेकर यांनी ‘गोमातेचे संरक्षण आणि गोमातेला ‘राष्ट्रमाता’ म्हणून दर्जा द्यावा, यासाठी हे अभियान देशभर राबवले जात आहे. हे निवेदन पंतप्रधान, राष्ट्रपती, राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांना पाठवण्यात आले आहे’, असे सांगितले.

या अनुषंगाने कुडाळ शहरात २७ एप्रिलला शहरातील साई मंदिर, हिंदु कॉलनी ते तहसील कार्यालयापर्यंत शोभायात्रा काढण्यात आली. त्यानंतर कुडाळचे नायब तहसीलदार अमरसिंह जाधव यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

वेंगुर्ला 

राजापुर

राजापूर येथे विश्व हिंदु परिषदेच्या सौ. माधवी हर्डीकर, हिंदु जनजागृती समितीचे विनोद गादीकर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे राजेंद्र कुशे, हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठानचे महेश  मयेकर, भाजपचे मोहन घुमे, नगरसेविका सौ. नार्वेकर, नगरसेवक दिलीप अमरे, डॉ. पाध्ये, रघुवीर बापट यांच्यासह अनेक गोमाताप्रेमी हिंदू उपस्थित होते.

दापोली

Latest News