-
हिंदु राष्ट्र-जागृती सभेत ओसंडून वहाणारा उत्साह, ‘जय श्रीराम’चा जयघोष !
-
महिला आणि युवक यांची लक्षणीय उपस्थिती

हडपसर (पुणे) – ओसंडून वहाणारा उत्साह, महिला आणि युवक यांची लक्षणीय उपस्थिती, ‘जय श्रीराम’च्या जयघोषात ५ एप्रिल या दिवशी अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण झालेल्या हडपसर (पुणे) येथील हिंदु राष्ट्र-जागृती सभेसाठी उपस्थित ११ सहस्र हिंदूंनी धर्मबंधुत्व जपत धर्मकार्य करण्याचा निर्धार केला. धर्मप्रेमींचा एवढा उत्साह होता की, काळेपडळ येथील कै. मारुतराव काळे शाळेचे मैदान सभा चालू होण्यापूर्वीच भरून गेले होते. हिंदूंनी अशी उपस्थिती दर्शवून हिंदु जनजागृती समितीचे कार्य तळागाळापर्यंत पोचल्याची ग्वाही दिली. सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये यांनी हिंदूंना महाभारतातील ‘अर्जुना’प्रमाणे कृती करण्याचे आवाहन केले, तर हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्याचे संघटक श्री. सुनील घनवट यांनी हिंदुत्वावरील आघातांच्या विरोधात वैधमार्गाने आवाज उठवण्यासाठी प्रोत्साहित केले. आमदार टी. राजा सिंह यांच्या प्रखर, तेजस्वी आणि धर्मविरोधकांवर आघात करणार्या शौर्ययुक्त मार्गदर्शनाने हिंदूंना कृतीच्या स्तरावर दिशा मिळाली.

श्रद्धास्थानांमध्ये धर्मांधांना प्रतिबंध करण्यासाठी आंदोलन
पुण्यातील मंदिरे, सारसबाग या ठिकाणी धर्मांधांची घुसखोरी होण्यासह अनेक ठिकाणी धर्मांधांचा उद्दामपणा वाढत आहे. धर्मांधांच्या या वाढत्या कारवाया रोखून हिंदूंच्या श्रद्धास्थानांवर येण्यापासून त्यांना प्रतिबंध करण्यात यावा, यासाठी येत्या १५ दिवसांमध्ये भव्य आंदोलन घेण्यात येईल, असे सभेत समितीच्या वतीने घोषित करण्यात आले.
हिंदूंमध्ये धर्मरक्षणाचे स्फुलिंग चेतवणारी हिंदु राष्ट्र-जागृती सभा !
हिंदूंची श्रद्धास्थाने, मंदिरे यांना अपवित्र करणार्या धर्मांधांना रोखणे आवश्यक ! – सुनील घनवट, हिंदु जनजागृती समिती

पुणे शहरात पुरंदर भागात ‘लँड (भूमी) जिहाद’ मोठ्या प्रमाणात वाढत आहे. शहर आणि जिल्ह्यात अनेक मंदिरांमध्ये मूर्तीची विटंबना होत असून या घटना दडपण्यासाठी पोलीस धर्मांध आरोपींना ‘माथेफिरू’ ठरवत आहेत. प्रत्येक घटनेत आरोपी ‘माथेफिरू’, कसा असू शकेल ? तरी मंदिरांच्या संदर्भात वारंवार घडणार्या या घटनांमागील मुख्य सूत्रधार शोधून त्यांच्यावर पोलीस प्रशासनाने कारवाई करणे अपेक्षित आहे. अनेक घटनांमध्ये पोलीस हे जिवावर उदार होऊन गोरक्षण करणार्या गोरक्षकांवर खोटे गुन्हे नोंद करून कसायांना मात्र मोकाट सोडत आहेत. अशा अनेक तक्रारी आहेत; मात्र यापुढील काळात असे प्रकार होता कामा नयेत.
पुण्यातील मंदिरे, सार्वजनिक ठिकाणी धर्मांधांची घुसखोरी आणि उद्दामपणा वाढत आहे. धर्मांधांच्या वाढत्या कारवाया रोखून हिंदूंच्या श्रद्धास्थानांवर येण्यापासून त्यांना प्रतिबंध करण्यासाठी भव्य आंदोलन घेण्यात येणार आहे. प्रत्येक शहर, गाव येथील बांगलादेशी घुसखोरांना शोधणे आवश्यक असून या मोहिमेला गती येण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर बांगलादेशी घुसखोरांना हाकलून लावण्याचा ठराव होणे आवश्यक आहे.
‘वानवडी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती कोपर्यात बसवली आहे. ती तिथे न ठेवता प्रशासनाने मुख्य चौकात लावावी’, असे आवाहन श्री. सुनील घनवट यांनी त्यांच्या भाषणात केले.
पुण्यभूमीची ओळख पुसण्याचे धर्मांधांचे षड्यंत्र हाणून पाडा ! – टी. राजा सिंह, आमदार

हडपसरसारख्या भागात गोहत्या करणारे धर्मांध पोलिसांसमोरच गोरक्षकांना चोप देत आहेत आणि धर्मांध छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीवर दगडफेक करत आहेत. स्थिती अशीच राहिली, तर हिंदूंच्या मुलांचे भवितव्य भीषण आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पुण्यभूमीची ओळख पुसण्याचे षड्यंत्र हिंदूंनी जागरूक राहून हाणून पाडले पाहिजे. हिंदूंमध्ये सुप्त असलेली लढाऊवृत्ती त्यांना आता जागृत करावीच लागेल.
यापुढील काळात हिंदूंनी जातींमध्ये विभाजित न रहाता ‘मी हिंदु आहे’, या भावनेने एकत्र येणे आवश्यक आहे. ज्यांची विचारसरणी ‘गजवा-ए-हिंद’ची (भारताचे इस्लामीकरण करण्याची) आहे, त्यांना हिंदूंनी पैसा का म्हणून द्यावा ? त्यामुळे धर्मांध-जिहादी यांच्याकडून कोणतीही खरेदी करू नका. धर्मांधांची आर्थिक रसद कापली, तर ‘लव्ह जिहाद’, ‘लँड जिहाद’ आणि धर्मांतर यांची विषवल्ली आपोआप नष्ट होईल. हिंदूंच्या घामाचा पैसा ‘मायनॉरिटी फंड’च्या (अल्पसंख्यांक निधीच्या) नावाने अल्पसंख्यांकांवर उधळला जात आहे. हा निधी तात्काळ बंद करून, तो गड-दुर्ग यांच्या संवर्धनासाठी वापरावा, अशी आमची मागणी आहे.
‘हिंदु राष्ट्र’ ही संकल्पना भारताचा मूळ स्वभाव ! – सद्गुरु स्वाती खाडये, सनातन संस्था

‘हिंदुत्वामुळे देश पिछाडीवर जाईल’, असा अपप्रचार केला जातो; मात्र ‘हिंदु राष्ट्र’ ही संकल्पना भारताचा मूळ स्वभाव आहे. असे असले, तरी २ दशकांपूर्वी जिहादी आतंकवाद लपवण्यासाठी ‘हिंदु आतंकवाद’, ‘भगवा आतंकवाद’, असे शब्दप्रयोग हे हिंदुत्वनिष्ठ संघटनांना दडपण्याचे एक ‘टूलकिट’ (‘टूलकिट’ म्हणजे एखादे षड्यंत्र पुढे रेटण्यासाठी विविध स्तरांवर आखलेली रणनीती) होते. त्यामुळे मालेगाव बाँबस्फोट, मडगाव स्फोट प्रकरण, दाभोलकर-पानसरे-कलबुर्गी-गौरी लंकेश या हत्या प्रकरणांत हिंदुत्वनिष्ठांना गोवण्यात आले. त्यांचा अतोनात छळ करण्यात आला. याच प्रकारे सनातनचे साधक समीर गायकवाड यांना कॉ. गोविंद पानसरे प्रकरणात नाहक अटक करण्यात आली. सामान्य शेतकरी कुटुंबातील समीर यांचा अन्वेषणयंत्रणांनी केलेला छळ आणि पुरो(अधो)गाम्यांनी केलेली अपकीर्ती यांमुळे त्यांचे जीवन उद्ध्वस्त झाले. त्यामुळे समीर यांचे झालेले निधन ही व्यवस्थेने केलेली हत्या आहे. अशा षड्यंत्राला हिंदूंनी विरोध केला पाहिजे.
सभेला उपस्थित मान्यवर
माजी धर्मादाय आयुक्त श्री. दिलीप देशमुख, ‘स्वातंत्र्यवीर सावरकर स्मृती प्रतिष्ठान’चे महामंत्री श्री. विद्याधर नारगोलकर, ‘हिंदु एकता आंदोलना’चे ‘पश्चिम महाराष्ट्र’चे अध्यक्ष श्री. संतोष जगताप, ‘भाजप पुणे कँटोन्मेंट’चे सरचिटणीस श्री. समीर शेंडकर, भाजपचे ४ नगरसेवक श्री. मारुति (आबा) तुपे, नगरसेवक श्री. राजेंद्र काशिनाथ भिंताडे, नगरसेविका सौ. उज्ज्वला जंगले, नगरसेविका सौ. प्राची अल्हाट, भाजपचे पुणे सरचिटणीस श्री. बाळासाहेब घुले, राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक निवृत्ती अण्णा बांदल, शिवसेनेचे ३ नगरसेवक श्री. गणेश कामठे, नगरसेविका शारदा भैरु भाडळे (माई), नगरसेविका सौ. मोनिका पवार, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नगरसेवक श्री. नितीन गावडे, ‘प्रतापगड उत्सव सिमती’चे श्री. विनायक सणस, भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्षा सौ. कल्पना धनंजय हांडे, उद्योजक श्री. कृष्णानंद नाईक, मांजरी येथील माजी सरपंच श्री. शिवराज घुले, हिंदुत्वनिष्ठ श्री. रवींद्र घुले, ह.भ.प. तुषार महाराज चौधरी, महाराष्ट्र मंदिर महासंघाचे पुणे जिल्हा समन्वयक ह.भ.प. दत्तात्रय चौरघे महाराज

उपस्थित संप्रदाय-संघटना-पक्ष
स्वामी समर्थ संप्रदाय, वारकरी संप्रदाय, श्री संप्रदाय, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, विश्व हिंदु परिषद, बजरंग दल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भाजप, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांसह पंचक्रोशीतील विविध स्थानिक संघटना-संप्रदाय, विविध गणेशोत्सव मंडळे
सभेच्या कालावधीतील मान्यवरांच्या प्रतिक्रिया
१. श्री. अजितदादा तुकदेव, अध्यक्ष, वेद वासुदेव प्रतिष्ठान, पुणे : हिंदु-राष्ट्र निर्मितीच्या कार्यात मशालीप्रमाणे तळपणार्या ‘सनातन संस्था’ आणि ‘हिंदु जनजागृती समिती’ या सनातन धर्माच्या कार्याची धुरा अन् हा वारसा पुढे चालवण्यासाठी अनंत खांदे समर्थपणे निर्माण करत आहेत. यासाठी अविरत अनुसंधान, स्वत:चे ब्रीद जनमानसात रुजवण्याची विलक्षण क्षमता हे संस्था आणि समिती यांचे असाधारणत्व आहे. आपल्या कार्यास उदंड शुभेच्छा !
२. श्री. समीर शेंडकर, नेते, भाजप, पुणे : हिंदु धर्म हा आपला प्राण आहे. हिंदु धर्म जागृत करणे, ही ‘श्रीं’ची इच्छा आहे. हे कार्य आपण सर्व जण मिळून करत आहोत, हे आपल्या हिंदू एकतेच प्रतीक आहे. असेच आपले कार्य चालू राहून ‘हिंदु राष्ट्र’ निर्माण व्हावे !
३. श्री. दीपक सोनी, अधिकारी, आयकर विभाग, पुणे : सनातन धर्माच्या कार्यासाठी समितीचे योगदान अद्वितीय आहे. समाजाच्या पुनरुत्थानासाठी आपल्या सर्वांनी योगदान देणे अनिवार्य आहे !
४. श्री. मारुतिआबा तुपे, नगरसेवक, भाजप : हिंदूंच्या एकजुटीचे कार्य ही संघटना करते. ‘आपल्या प्रभागातील सर्व हिंदु बांधवांना आपण एक केले आहे’, याचा मला अभिमान आहे.
५. सौ. मोनिका नीलेश पवार, नगरसेविका, शिवसेना : हिंदु जनजागृती समितीचे व्यापक प्रबोधन आणि मुलींना धर्माचे ज्ञान मिळाल्यामुळे ‘लव्ह जिहाद’मुळे ज्या मुलींची फसगत होणार होती, त्यांना योग्य-अयोग्य समजू लागले आहे. याच समवेत अन्य प्रकारचे जे ‘जिहाद’ चालू आहेत, त्याविषयीची माहिती हिंदूंपर्यंत समितीमुळे पोचत आहे !
६. श्री. राजेंद्र भिताडे, नगरसेवक, भाजप : हडपसर परिसरात मुसलमानांची संख्या लक्षणीय वाढत आहे. हिंदूंनी स्वत:च्या मालमत्ता (भूमी) या अन्य धर्मियांना विकू नयेत. प्रत्येक सोसायटीमध्ये मंदिर बांधा, तसेच सर्व व्यवहार हे हिंदु व्यापार्यांच्या समवेत करा !
७. ह.भ.प. तुषार महाराज चौधरी, कीर्तनकार, अखिल भारतीय वारकरी समिती तालुका, युवा समिती प्रमुख : सर्व हिंदूंनी एकत्र येणे पुष्कळ आवश्यक आहे. आज या राष्ट्र-जागृती सभेच्या माध्यमातून सर्व हिंदू एकत्र आले, त्यामध्ये माता-भगिनींचा लक्षणीय सहभाग आहे. त्या सर्वांच्या मनात सभेप्रती, धर्माप्रती प्रेम दिसून आले. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, ‘एकमेका साहाय्य करू, अवघे धरू सुपंथ’, त्याप्रमाणे रामराज्य स्थापन करण्यासाठी सर्वांनी संघटित व्हावे !
८. ह.भ.प. दत्तात्रय चोरघे महाराज, पुणे जिल्हा समन्वयक, महाराष्ट्र मंदिर महासंघ : सद्गुरु स्वाती खाडये, तसेच श्री. सुनील घनवट यांनी स्वत:च्या अमोघ वाणीने सर्वांना प्रभावित केले. आमदार टी. राजा सिंह यांनी वाघाप्रमाणे डरकाळी फोडली. या सभेच्या माध्यमातून खर्या अर्थाने हिंदु राष्ट्र-जागृती दिसत होती.
९. श्री. गणेश बाळासो कामठे, नगरसेवक, शिवसेना : सभेचे आयोजन अतिशय सूक्ष्म पद्धतीने केले असल्याने कुठेही वाहतुकीस अडथळा झाला नाही. रस्त्यावरसुद्धा सभा पहाण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. सभेत तरुण-तरुणींचा सहभाग मोठ्या प्रमाणात होता. सभेला झालेली गर्दी पाहून हिंदू कुठेतरी जागृत झाल्याचे दिसले. त्यामुळे आनंद वाटला !
१०. सौ. शारदा भैरू भाडळे (माई), नगरसेविका, शिवसेना : ज्या छत्रपती शिवरायांमुळे आपण ताठ मानेने जगू शकत आहोत, त्या शिवरायांच्या कार्याविषयी या सभेत अतिशय चांगल्या प्रकारे वक्त्यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले. त्यामुळे या सभेचा मला पुष्कळ अभिमान वाटला !







