Menu Close

केडगाव (पुणे) : गुरव समाज संमेलनात पुजाऱ्यांचे संघटन करण्याचे मंदिर महासंघाचे आवाहन

मंदिरांचे संघटन आणि पुजार्‍यांचे ऐक्य, ही काळाची आवश्यकता – सुनील घनवट, राष्ट्रीय संघटक, मंदिर महासंघ

केडगाव (पुणे) – मंदिरांमध्ये पूजा करतांना येणार्‍या, त्याचप्रमाणे पुजार्‍यांच्या समस्या सोडवण्यासाठी केवळ एका समाजापुरता विचार न करता, सर्व समाजांच्या पुजार्‍यांनी संघटित होणे आवश्यक आहे. पुजारी आणि विश्वस्त यांच्यात समन्वय नसल्यास मंदिरांचे सरकारीकरण होण्याचा धोका वाढतो. ज्याप्रमाणे काही राज्यांमध्ये मुल्ला-मौलवींना ‘वेतन’ आणि ‘अनुदान’ दिले जाते, त्याच धर्तीवर महाराष्ट्र सरकारने राज्यातील पुजार्‍यांनाही अनुदान द्यावे, असे वक्तव्य मंदिर महासंघाचे राष्ट्रीय संघटक श्री. सुनील घनवट यांनी केले. केडगाव येथील ‘बोरमलनाथ देवस्थान’ येथे आयोजित ‘गुरव समाज संमेलनात’ ते मार्गदर्शक म्हणून बोलत होते. या वेळी राज्यभरातून १५० हून अधिक मंदिरांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

श्री. सुनील घनवट पुढे म्हणाले की, वक्फ बोर्डाच्या कह्यात असलेल्या भूमी मुक्त करणे, ही आपली सर्वांची सामूहिक मागणी असली पाहिजे. मंदिर आणि पुजारी यांचे संघटन, ही सध्याच्या काळाची मोठी आवश्यकता आहे. पुजारी आणि व्यवस्थापन यांनी एकत्र येऊन मंदिरांच्या रक्षणासाठी सिद्ध व्हावे. या संमेलनासाठी ‘भीमाशंकर देवस्थाना’चे अधिवक्ता सुरेश चौधरी, ‘बोरमलनाथ देवस्थाना’चे अध्यक्ष श्री. कैलास आबा यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. संपूर्ण महाराष्ट्रातून आलेल्या गुरव समाजाच्या प्रतिनिधींनी मंदिर रक्षण आणि संघटन यांचा निर्धार व्यक्त केला.

Read more on Mandir Mahasangh

Latest News