Menu Close

‘हिंदु आतंकवादा’चे षड्यंत्र रचणार्‍यांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे – हिंदु जनजागृती समिती

मुंबई – राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेच्या न्यायालयाने मालेगाव बाँबस्फोटातील सर्व आरोपींना निर्दोष मुक्त केल्यामुळे अखेर ‘हिंदु आतंकवाद’ वा ‘भगवा आतंकवाद’ या नावाने रचलेले घृणास्पद काँग्रेसी षड्यंत्र उघडे पडले आहे.

केवळ हिंदू असल्यामुळे राष्ट्रनिष्ठ साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर, कर्नल पुरोहित, मेजर उपाध्याय, सुधाकर चतुर्वेदी, समीर कुळकर्णी आणि अजय राहिरकर यांच्यासारख्या अनेक राष्ट्रप्रेमी व्यक्तींना अकारण वर्षानुवर्षे तुरुंगात डांबण्यात आले. त्यांचा अमानुष मानसिक आणि शारीरिक छळ केला गेला. हा केवळ त्यांच्या विरोधातील अन्याय नव्हे, तर संपूर्ण हिंदु समाजाला अपकीर्त करण्याचा मोठा विखारी कट होता. त्यामुळे हा खटला आता बंद करून चालणार नाही; हिंदूंना आतंकवादी ठरवण्याचे षड्यंत्र रचणार्‍यांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी केली आहे.

श्री. शिंदे पुढे म्हणाले की,

१. मालेगाव प्रकरणात ‘हिंदु आतंकवाद’ या शब्दाचा वापर करणारे तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी नंतर ती चूक असल्याचे जाहीरपणे मान्य केले; पण त्यांनी तो शब्द कुणाच्या सांगण्यावरून वापरला ? हिंदूंना अपकीर्त करण्यामागे कुणाचे षड्यंत्र होते ? त्या सूत्रधारांवरही कारवाई झाली पाहिजे.

२. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मध्यंतरी ‘या देशात हिंदु आतंकवाद ही पाकिस्तानातील सैनिकी इस्लामी आतंकवादापेक्षा मोठी समस्या आहे’, असे विधान अमेरिकेच्या राजदूतासमोर केल्याचे ‘विकिलीक्स केबल’द्वारे (अमेरिकेतील गोपनीय दस्ताऐवजांद्वारे) उघड झाले होते. हिंदु समाजावर आतंकवादाचा खोटा शिक्का मारणारे, राष्ट्रनिष्ठ व्यक्तींना यात अडकवणारे आणि अन्वेषणाच्या नावाखाली अन्याय करणारे सगळे दोषी शोधून त्यांना कठोर शिक्षा देणे हाच न्याय आहे !

Latest News