सासवड (पुणे) येथे वारकरी संप्रदाय संघटना आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने वारकरी संत बैठक !

पुणे – ‘धर्माचे कारण करणे पाखंड खंडन’ या वारकर्यांच्या अभंगाचा प्रत्यय आज वारीत आला. याला निमित्त होते ते वारकरी संत बैठकीचे ! सासवड येथे वारकरी संप्रदाय संघटना आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने वारकरी संत बैठक उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. या बैठकीत वारकरी संप्रदायातील महाराजांनी क्षात्रतेजयुक्त भाषणे करून उपस्थितांचे प्रबोधन केले आणि हिंदूंना संघटित करून हिंदु राष्ट्र स्थापण्यासह वारीतील पुरो(अधो)गाम्यांची घुसखोरी रोखण्याचा निर्धार केला. २३ जून या दिवशी दुपारी ४.३० ते सायंकाळी ६ या वेळेत झालेल्या या बैठकीला अखिल भारतीय संत समितीचे प्रदेश महामंत्री स्वामी भारतानंद महाराज, राष्ट्रीय वारकरी परिषदेचे महाराष्ट्र राज्य प्रवक्ते ह.भ.प. महेंद्र महाराज म्हस्के, जोग वारकरी शिक्षणसंस्था, आळंदीचे ह.भ.प. अविनाश देशमुख, अमरावतीचे ह.भ.प. पद्माकर महाराज देशमुख, तुळजापूर येथील महंत योगी मावजीनाथ महाराज, महंत इच्छागिरी महाराज आणि हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र अन् छत्तीसगड राज्यांचे संघटक श्री. सुनील घनवट उपस्थित होते. बैठकीचे प्रास्ताविक हिंदु जनजागृती समितीचे पुणे जिल्हा समन्वयक श्री. पराग गोखले यांनी केले. ६ जुलै या दिवशी पंढरपूर येथे असलेल्या वारकरी महाअधिवेशनाचे निमंत्रण या वेळी सर्वांना देण्यात आले.
जे आपल्या धर्माला मानतच नाहीत, त्यांच्याकडून खरेदी कशासाठी ? – महंत इच्छागिरी महाराज
आज हिंदूंमध्ये जनजागृती करण्याची वेळ का आली आहे ? वारीत धर्मांध त्यांच्या धर्माचे गुणगान गाणारा फलक लावतात. जागृत वारकर्यांनी तो काढूनच टाकणे अपेक्षित आहे. जे आपल्या धर्माला मानतच नाहीत, त्यांच्याकडून खरेदी कशासाठी ? सर्वधर्मसमभाव हिंदूंनाच शिकवला जातो. आता काही वारकरी महाराज हिंदु धर्माविषयी बोलत आहेत, हे मी प्रथमच पहात आहे.
श्री तुळजाभवानी संस्थानला कोट्यवधी रुपयांच्या अनुदानाचा भक्तांना काय लाभ ? – महंत मावजीनाथ महाराज
या वेळी मंदिरांवरील विविध आघातांविरुद्ध बोलतांना महंत मावजीनाथ म्हणाले, तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी संस्थानला कोट्यवधी रुपयांचा निधी मिळतो; मात्र या निधीतून भक्तांना कुठलीही सुविधा दिली जात नाही. कुलाचार, कुळधर्म पार पाडण्यासाठी मंदिराच्या परिसरात विशिष्ट स्थान नाही. मंदिरावर जिल्हाधिकार्यापासून ते तहसीलदारापर्यंत प्रशासकीय अधिकारी आहेत. प्रशासकीय अधिकार्यांचा हिंदु धर्माचा अभ्यास नाही, त्यामुळे ते हिंदूंसाठी काही करत नाहीत. मंदिरांद्वारे हिंदु धर्माचे काम होण्यासाठी भक्तांनी मंदिराला पत्रे पाठवावीत.
वारीत अन्य धर्मीय प्रचार-प्रसार करत असतील, तर आम्हाला कळवा ! – ह.भ.प. पद्याकर महाराज देशमुख
मी कट्टर हिंदु वारकरी आहे. ‘संविधान दिंडी’वाले मनुस्मृति जाळायला सांगतात. मनुस्मृति हिंदूंसाठी राज्यघटनेप्रमाणेच आहे. वारीत पत्रके वाटणार्या ख्रिस्ती, मुसलमान यांच्याविषयी आम्हाला कळवा, त्यांना आम्ही प्रत्युत्तर देऊ. लव्ह जिहादमध्ये फसवून ठार मारलेल्या आतापर्यंत ९०० हून अधिक हिंदु मुली सुटकेसमध्ये सापडल्या आहेत. माझ्याकडे त्यांची सूचीच आहे. हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते संसार आदींचा त्याग करून धर्मकार्य करतात, त्यांना सर्वांनी बळ द्यावे. ते हिंदु धर्म तेवत ठेवण्याचे काम करत आहेत. आमचे आयुष्य त्यांना मिळावे, अशी देवाकडे प्रार्थना करतो.
आम्ही राज्यघटनेनुसार वागणारे, आम्हाला ती शिकवू नये ! – ह.भ.प. महेंद्र महाराज म्हस्के
वारी एकतेचा संदेश देते, त्यामुळे पुरोगाम्यांनी तेथे विचार पसरवण्याचे कामच नाही. आम्ही पुरोगाम्यांच्या घुसखोरीविषयी मोहीम राबवत आहोत. आम्ही राज्यघटनेनुसारच वागतो. आम्हाला काही तथाकथित मंडळींनी राज्यघटना शिकवण्याची आवश्यकता नाही. १७, १८ आणि १९ जून या ३ दिवसांतच मी धर्मांधांची ४३ दुकाने वारी परिसरातून वैयक्तिक स्तरावर काढून टाकली आहेत. आम्ही वारकरी जातीभेद किंवा धर्मभेद करत नाही; मात्र जेव्हा धर्म विचारून हिंदूंना गोळ्या घातल्या जातात, तेव्हा विरोध करावा लागतो. हिंदु जनजागृती समिती, सनातन संस्था यांच्या समवेत वारकर्यांनी उभे रहावे. वारकर्यांना सनातन, समिती यांच्याशी जोडूया आणि आपण हिंदु राष्ट्राकडे वाटचाल करूया, असे मी आश्वासित करतो.
वारकर्यांनी हिंदु धर्म टिकवला असतांना ते हिंदु नसल्याचे सांगणे, हा खोटा प्रचार ! – स्वामी भारतानंद महाराज

वारकरी सनातनी आहेत. वारकर्यांनीच हिंदु धर्म टिकवला असतांना ते हिंदु नाहीत, असा खोटा प्रचार केला जात आहे. वारकरी संतांनाही जात्यंधांनी जातींमध्ये वाटले आहेत. ‘ज्ञानदेवे रचिला पाया…’ याऐवजी ‘नामदेवे रचिला पाया…’ असा अभंग म्हटला जातो. काही जात्यंध, ब्रिगेडी संघटना मराठा समाजात शिरल्या असून त्या समाजात फूट पाडत आहेत. हिंदुत्वनिष्ठच हा राष्ट्रभक्त असतो, धर्मनिरपेक्ष कधीही राष्ट्रभक्त असत नाही. आळंदीत १६ जणांचे धर्मांतर झाले. हे वारी अशुद्ध, अपवित्र करण्याचे काम आहे. धर्मांध महाराष्ट्रातील पडघा, बोरीवली सारख्या गावाला ‘अल् शाम’ घोषित करून तेथे भारताची राज्यघटना लागू होणार नाही, असे बिनदिक्कत सांगत असतांना ‘संविधान दिंडी’वाले त्यांचे प्रबोधन का करत नाहीत ? त्यांचे वारीत काय काम ? आपण जागृत व्हावे.
वारकर्यांनी आता भक्तीसह शक्तीही दाखवण्याची वेळ ! – सुनील घनवट

वारीत येऊन धर्मांध ख्रिस्ती, मुसलमान यांची हिंदूंना फसवून धर्मप्रचार करण्याची हिंमत कशी होते ? वारीत ख्रिस्ती पत्रके वाटतात, तर पालखी मुक्कामाच्या जवळच ‘अल्लाविना कुणी देव नाही’, असे ऊर्दूमध्ये फलक लावतात. यासाठी काळानुसार भक्तीसह शक्तीही दाखवण्याची वेळ आली आहे. प्रत्येक वर्षात १८ लाखांहून अधिक हिंदूंचे धर्मांतर होते. नगर येथे ‘मतमाऊली’ची वारीही ख्रिस्ती काढतात, येशूनाम सप्ताह साजरा करतात, याविरुद्ध जागरूक राहिले पाहिजे. देशभरातील साडेचार लाख, तर महाराष्ट्रातील दीड लाख मंदिरे सरकारच्या कह्यात आहेत. एकही मशीद किंवा चर्च नाही, ‘संविधान दिंडी’वाल्यांकडे याचे उत्तर आहे का ? अंनिसचे प्रशांत कांबळे, सुनील जगताप या कार्यकर्त्यांविरुद्ध नक्षलवादी कारवायांचे गुन्हे नोंद आहेत. असे अंनिसवाले वारीत कसे सहभागी होतात ?




