Menu Close

वारीत घुसलेल्या शहरी नक्षलवाद्यांची चौकशी करणार – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आश्वासन

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देतांना हिंदु जनजागृती समितीचे सतीश सोनार

मुंबई – आषाढी वारी ही महाराष्ट्राच्या आध्यात्मिक आणि सांस्कृतिक जीवनाचा अत्यंत पवित्र भाग आहे. अनेक शतके ही वारी अखंडितपणे चालू आहे. या वारीमध्ये कोणत्याही प्रकारचा भेदभाव नसतो. वारीमध्ये अनेक साम्यवादी, पुरोगामी विचारांचे, देवाला न मानणार्‍या अंनिसचा सहभाग संशयास्पद आहे. त्यामुळे याविषयी हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन निवेदन दिले. या वेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी त्वरित त्यावर स्वाक्षरी करत ‘संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून उचित कार्यवाही करावी’, असा आदेश दिला.

राज्याचे गृहराज्यमंत्री (शहरे) योगेश कदम यांचीही हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांनी भेट घेतली. या वेळी समितीच्या वतीने त्यांनाही या विषयाचे निवेदन देण्यात आले. यावर मंत्री कदम यांनी ‘राज्याचे पोलीस महासंचालक आणि विभागाचे पोलीस महानिरीक्षक यांच्याशी बोलतो’, असे आश्वासन समितीला दिले.

शिवसेनेच्या आमदार डॉ. मनीषा कायंदे यांनी विधान परिषदेत उठवला आवाज !

देव न मानणार्‍या लोकांनी वारीत शिरून भाविकांचा बुद्धीभेद करणे, तसेच त्यांना देवापासून दूर नेणे, हे हिंदु धर्मावरील आक्रमण आहे. काही शहरी नक्षलवादी वेगवेगळ्या संस्थांच्या नावाने वारीत शिरले आहेत. सरकारने याची गंभीर नोंद घ्यावी आणि वारीत शिरलेल्या शहरी नक्षलवाद्यांवर कारवाई करावी, अशी मागणी शिवसेनेच्या आमदार डॉ. मनीषा कायंदे यांनी विधान परिषदेत केली.

२ जुलै या दिवशी माहितीच्या सूत्राच्या (‘पॉईंट ऑफ इन्फोर्मेशन’च्या) अंतर्गत आमदार डॉ. मनीषा कायंदे यांनी याविषयीची माहिती विधान परिषदेत दिली. या वेळी डॉ. मनीषा कायंदे म्हणाल्या, ‘‘आषाढी एकादशी काही दिवसांवर आली आहे. पंढरीची वारी जगप्रसिद्ध आहे.

स्रोत : सनातन प्रभात

Related News