देश आणि हिंदु धर्म यांच्याविरुद्ध दुष्प्रचार करणारी ‘डिसमेंटलिंग ग्लोबल हिंदुत्व’ ही आंतरराष्ट्रीय ‘ऑनलाईन’ परिषद रहित होण्यासाठी प्रयत्न करा !

हिंदु जनजागृती समितीची स्थानिक प्रशासकीय अधिकार्‍यांना निवेदन देऊन केंद्रीय गृहमंत्री आणि परराष्ट्रमंत्री यांच्याकडे मागणी

सिंधुदुर्ग – ‘डिसमेंटलिंग ग्लोबल हिंदुत्व’ (हिंदुत्वाचे जागतिक स्तरावर उच्याटन) या आंतरराष्ट्रीय ऑनलाईन परिषदेचे (कॉन्फरन्सचे) आयोजन १० ते १२ सप्टेंबर २०२१ या कालावधीत होणार आहे. या परिषदेविषयी सामाजिक माध्यमांतून मिळालेल्या माहितीनुसार हिंदु धर्म, हिंदुत्व आणि हिंदूंविरुद्ध दुष्प्रचार केला जाण्याची शक्यता असून धार्मिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्यामुळे या आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजक, यामध्ये सहभागी होणारे आणि यांना साहाय्य करणारे यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने मा. गृहमंत्री आणि मा. परराष्ट्रमंत्री, भारत सरकार यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. मा. गृहमंत्री आणि मा. परराष्ट्रमंत्री यांना देण्यासाठीचे हे निवेदन सिंधुदुर्ग जिल्ह्यात निवासी उपजिल्हाधिकारी सौ. शुभांगी साठे यांना, तर सावंतवाडी, दोडामार्ग, वेंगुर्ले, कणकवली आणि मालवण येथे तहसीलदारांना देण्यात आले.

या निवेदनात म्हटले आहे की,

गेल्या काही दिवसांपासून सामाजिक माध्यमांतून एका आंतरराष्ट्रीय  परिषदेविषयी देशात असंतोषाचे वातावरण निर्माण झाल्याचे लक्षात येत आहे. ‘डिसमेंटलिंग ग्लोबल हिंदुत्व’ असे या परिषदेचे नाव असून ही परिषद १० ते १२ सप्टेंबर २०२१ या कालावधीत ‘ऑनलाईन’ होणार आहे. या परिषदेच्या प्रायोजकांमध्ये जगभरातील नामवंत विद्यापिठांचा समावेश असल्याचे या परिषदेच्या प्रसारसाहित्यांतून दिसून येते. तरी या परिषदेविषयीची काही गंभीर सूत्रे आपल्या निदर्शनास आणून देत आहोत.


१. विद्यापिठासारख्या ठिकाणी भाषणस्वातंत्र्य आणि विचारस्वातंत्र्य या मूल्यांचे संवर्धन, तसेच रक्षण झाले पाहिजे; तथापि या कार्यक्रमाशी संलग्न लोकांचा हिंदूंना हीन लेखण्याचा, तसेच हिंदूंचा झालेला वंशसंहार नाकारण्याचा प्रदीर्घ इतिहास जगजाहीर आहे. असे विचार जगभरातील विद्यापिठांतील विद्यार्थ्यांपर्यंत जाणे, हे अत्यंत चुकीचे ठरेल.

२. या कार्यक्रमात विद्वत्तापूर्ण कार्य केल्याचा दावा करणार्‍यांना सहभागी करून घेतल्याचे आयोजकांनी सांगितले आहे. यांच्या संकेतस्थळावर ‘साऊथ एशिया स्कॉलर एक्टिव्हिस्ट कलेक्टिव्ह’ यांनी लिहिलेले ‘फिल्ड मॅन्युअल अगेन्स्ट हिंदुत्व ट्रोल्स’ याचा उल्लेख आहे. या संघटनेचा मुख्य सदस्य हिंदु पालकांच्या सामाजिक संकेतस्थळांवरील खात्यांच्या मागावर असल्याच्या प्रकरणी आरोपी आहे. हा सदस्य हिंदूंच्या विरोधातील एका कार्यक्रमाला उपस्थित होता. हा एक दुर्दैवी विरोधाभास आहे की, इतरांना धमकावण्याचे वेगवेगळे मार्ग काढणारे हे लोक जागतिक व्यासपिठावर ‘हिंदुत्वाचा वाईटपणा’ या विषयावर दुराग्रहाने सांगत आहेत.

३. या कार्यक्रमात ‘बहिष्कार घालणारा नागरिकत्व सुधारणा कायदा’ या विषयावर चर्चा होणार आहे. वास्तविक अफगाणिस्तान आणि धर्माच्या आधारावर फाळणी होऊन भारतापासून विलग झालेले पाकिस्तान, बांगलादेश या इस्लामी देशांत होणार्‍या छळामुळे भारताचा आश्रय घेणारे हिंदू, शीख, ख्रिस्ती, बौद्ध, जैन आणि पारशी यांना भारतीय नागरिकत्व देण्याविषयीचा ‘नागरिकत्व सुधारणा कायदा’ हा एक पथदर्शी कायदा आहे. या देशांतील मुसलमानांना भारताचे नागरिकत्व नाकारण्यात आलेले नाही किंवा त्यांना भारतात प्रवेश करण्यापासूनही रोखण्यात आलेले नाही. (ताज्या अहवालानुसार, अफगाणिस्तानातून पळून येणार्‍या मुसलमानांना ‘आपत्कालीन व्हिसा’ आणि शरणार्थींचा दर्जा देण्यात येत आहे.) मग याला बहिष्कार घालणे कसे म्हणता येईल ? याला वस्तूस्थितीची समतोल मांडणी, असे म्हणता येईल का ?

४. आणखी एक महत्त्वपूर्ण सूत्र म्हणजे या कार्यक्रमात ‘नोटबंदीचे अपयशी धोरण आणि दुर्भावनायुक्त शेतकी सुधारणा धोरण’ या विषयांचा समावेश करण्यात आला आहे. सरकारी धोरणे हिंदुत्वाशी किंवा कोणत्याही धर्माशी कशी जोडता येतील ? हे समजण्यापलीकडचे आहे.

५. आज दुर्दैवाने सनातन धर्म (हिंदु धर्म किंवा हिंदुत्व) जागतिक पातळीवर चुकीच्या पद्धतीने मांडला जात आहे. त्यामुळे हिंदु कर्मचारी आणि विद्यार्थी यांना त्यांची श्रद्धा आणि पद्धती मोकळेपणाने मांडता येत नाहीत. उदाहरणार्थ पाश्चिमात्य विद्वानांनी नाझींच्या चिन्हाला स्वस्तिक म्हटले; पण प्रत्यक्षात हिंदूंचे स्वस्तिक चिन्ह वैभवाचे प्रतीक आहे आणि त्याचा नाझींच्या चिन्हाशी काहीही संबंध नाही. भारताबाहेरील हिंदू स्वस्तिक हे त्यांचे शुभचिन्ह प्रदर्शित करू शकत नाहीत; कारण त्याकडे तिरस्काराचे प्रतीक म्हणून पाहिले जाते.

६. आता असा कार्यक्रम होत आहे की, ज्यामध्ये हिंदूंविरुद्ध दुष्प्रचार केला जाईल. (भारतीय समाजातील असमानता आणि जातीव्यवस्था यांवरून हिंदुत्वाला लक्ष्य केले जातच आहे.) त्यामुळे ज्या विद्यापिठांनी या कार्यक्रमाला प्रायोजित केले आहे, तेथील हिंदु कर्मचारी आणि विद्यार्थी त्यांच्या श्रद्धा, परंपरा जोपासण्यास कचरतील. त्यामुळे केवळ ‘हिंदु’ असण्यामुळे हिंदु विद्यार्थ्यांचा छळही होऊ शकतो.

७. या कार्यक्रमासाठी निवडण्यात आलेली वेळ हा निवळ योगायोग असू शकत नाही. जगावर पुन्हा ९/११ सारखे आतंकवादी आक्रमण होण्याची भीती आहे.  अफगाणिस्तानमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी जागतिक समुदायाने २ दशके घेतलेले प्रयत्न मातीमोल ठरवत तालिबान्यांनी अफगाणिस्तानवर नियंत्रण मिळवले आहे. या पार्श्वभूमीवर असा कार्यक्रम घेणे म्हणजे शांतता, प्रेम, सद्भावना, सर्वसमावेशकता शिकवणार्‍या धर्माच्या लाखो अनुयायांचे अमानवीकरण करणे, तसेच जगाचे लक्ष खर्‍या समस्यांपासून जाणीवपूर्वक भरकटवण्यासारखे आहे.

‘हिंदु फॅसिझम्’सारखे शब्द वापरून ‘वसुधैव कुटुम्बकम्’ची शिकवण देणार्‍या हिंदु धर्मावर आघात केले जात आहेत. जेव्हा ते ‘दडपशाही’विषयी बोलतात, तेव्हा ते ही वस्तूस्थिती लपवतात की, हिंदु धर्मशास्त्रामध्ये वैश्विक शांती आणि समृद्धी यांसाठी मंत्र आहेत.

याविषयीचे निवेदन सावंतवाडीचे नायब तहसीलदार मनोज मुसळे, वेंगुर्लेचे तहसीलदार प्रवीण लोकरे, ओरोस (जिल्हा मुख्यालय) येथे निवासी उपजिल्हाधिकारी सौ. शुभांगी साठे, दोडामार्गचे तहसीलदार अरुण खानोलकर, कणकवलीचे नायब तहसीलदार श्रीमती सुजाता पाटील आणि मालवणचे नायब तहसीलदार गंगाधर कोकरे यांना देण्यात आले.

हिंदु जनजागृती समितीने केलेल्या मागण्या

अ. या कार्यक्रमाद्वारे हिंदु धर्म आणि हिंदुत्व यांविषयी अत्यंत चुकीचा प्रसार करून धार्मिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्यामुळे या कार्यक्रमातील जे वक्ते किंवा आयोजक भारतीय आहेत, त्यांच्यावर गुन्हे नोंद करून योग्य ती कारवाई करावी, तसेच त्यांनी या कार्यक्रमात सहभाग घेऊ नये, या दृष्टीने प्रतिबंधात्मक कारवाई करावी.

आ. या कार्यक्रमाला ज्या विदेशांतील विद्यापिठांनी पाठिंबा दिला आहे किंवा प्रायोजकत्व घेतले आहे, त्यांना भारत सरकारकडून पत्र पाठवून ‘हा कार्यक्रम भारतीय संस्कृती आणि सभ्यता यांच्याविषयी चुकीचा प्रसार करणारा असल्याने कार्यक्रम रहित करावा किंवा आपले प्रायोजकत्व मागे घ्यावे’, असे पत्र पाठवावे. तरीही काही झाले नाही, तर या विद्यापिठांवर कारवाई करण्याविषयी भारत सरकारने संबंधित देशांशी पत्रव्यवहार करावा.

इ. ही परिषद भारतद्रोही आणि हिंदुद्रोही कार्यक्रम (अजेंडा) घेऊन समाजात हिंदूंना अपकीर्त करत असल्याने यामध्ये सहभागी होऊ नये, असे भारत सरकारने नागरिकांना आवाहन करावे.


#DGH_Panelists_Hindu_Haters ट्विटर ट्रेंड राष्ट्रीय स्तरावर प्रथम स्थानी !

हिंदूंनो, भारताला शत्रूंपासून मुक्त करून ‘हिंदु राष्ट्र’ घोषित करण्यासाठी कटीबद्ध व्हा !

मुंबई – हिंदूंना हिंसक दाखवण्याचे आंतरराष्ट्रीय स्तरावर षड्यंत्र राबवले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून ‘डिसमॅन्टलिंग ग्लोबल हिंदुत्व’ (हिंदुत्वाचे जागतिक स्तरावर उच्चाटन) या विषयावर आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. जगातील ४० हून अधिक विद्यापिठे या परिषदेची सहप्रायोजक आहेत. १० ते १२ सप्टेंबर या कालावधीत होणार्‍या या परिषदेला विरोधही होत आहे. १ सप्टेंबरच्या सायंकाळी देश-विदेशांतून सहस्रावधी

हिंदुत्वनिष्ठांनी #DGH_Panelists_Hindu_Haters या ‘हॅशटॅग’चा वापर करून ‘ट्विटर’च्या माध्यमातून अभियान राबवले. जगभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याने हा ट्विटर ट्रेंड अवघ्या अर्ध्या घंट्यातच भारतात प्रथम क्रमांकावर आला.

ऑनलाईन अभियानाची ठळक वैशिष्ट्ये

१. अमेरिका, युनायटेड किंगडम, आयर्लंड, जर्मनी, स्वित्झर्लंड, ऑस्ट्रिया, दक्षिण आफ्रिका, मॉरिशस, संयुक्त अरब अमिरात, जपान, श्रीलंका, बांगलादेश, नेपाळ, ऑस्ट्रेलिया आदी देशांमधील हिंदूंनी या ऑनलाईन आंदोलनामध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

२. हिंदूंनी हातात ‘प्ला-कार्ड’ (हस्तफलक) धरून स्वतःची छायाचित्रे अथवा व्हिडिओ अपलोड करत आंतरराष्ट्रीय परिषदेचा निषेध केला.

३. ‘हिंदुविरोधी आंतरराष्ट्रीय परिषदेचे वैश्विक षड्यंत्र थांबवा !’, ‘हिंदुविरोधी आंतरराष्ट्रीय परिषद रहित करा !’, या आशयाच्या विविध मागण्या या आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आल्या.

४. कार्यक्रम रहित करण्यासाठी देशभरात विविध ठिकाणी केंद्रीय गृहमंत्री आणि परराष्ट्रमंत्री यांच्या नावे प्रशासनाला प्रत्यक्ष निवेदने देण्यात आली.

५. हिंदु जनजागृती समितीने तिच्या संकेतस्थळावरून या हिंदुविरोधी कार्यक्रमाद्वारे होणारे षड्यंत्र हाणून पाडण्यासाठी ‘ऑनलाईन हस्ताक्षर अभियान’ चालू केले आहे.

ऑनलाईन याचिकेची (‘पिटीशन’ची) लिंक : https://www.HinduJagruti.org/protest-dgh



​संबंधित बातम्या

धर्मरक्षण आणि पाखंडाचे खंडण म्हणून हिंदुविरोधी विचारांचा वैचारिक प्रतिकार करणे आवश्यक ! – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

देश-विदेशात हिंदुविरोधी कार्यक्रमांचे आयोजन झाल्यास निद्रिस्त हिंदूंना जागृत करून त्यांना अवगत करणे, सनातन हिंदु धर्माच्या तत्त्वज्ञानाचा प्रसार करणे, याचे दायित्व आपल्यावर (हिंदुत्वनिष्ठांवर) आहे. Read more »

‘डिसमेंटलिंग ग्लोबल हिंदुत्व’ या हिंदुविरोधी कार्यक्रमाचे खरे स्वरूप उघड करणारा ट्विटर ट्रेंड द्वितीय स्थानी !

या परिषदेचा खरा चेहरा समोर आणण्यासाठी धर्मप्रेमी हिंदूंनी ट्विटरवर #DGH_Conf_Agenda_Hinduphobia हा ‘हॅशटॅग’ (एकाच विषयावर घडवून आणलेली चर्चा) ट्रेंड केला. हिंदूंच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे हा ट्विटर ट्रेंड अवघ्या अर्ध्या घंट्यातच राष्ट्र्रीय ट्रेंडमध्ये द्वितीय क्रमांकावर होता. सायंकाळपर्यंत या विषयावर १५ सहस्रांहून अधिक ट्वीट्स करण्यात आले होते. Read more »

‘डिसमेंटलिंग ग्लोबल हिंदुत्व’ या हिंदुविरोधी कार्यक्रमाचा चेहरा उघड करणारा ट्विटर ट्रेंड द्वितीय स्थानी !

१० ते १२ सप्टेंबर या कालावधीत झालेली Dismantling Global Hindutva ही परिषद निव्वळ हिंदु धर्माला बदनाम करण्यासाठी आयोजित केली गेली होती, हेच लक्षात येते. Read more »

हिंदुद्वेष्ट्यांचे वैचारिक उच्चाटन !

वाईटातून चांगले घडते’ याचे सध्याचे उत्तम उदाहरण म्हणजे ‘हिंदुत्वाचे जागतिक स्तरावरील उच्चाटन’ करण्याच्या समान उद्देशाने प्रेरित होऊन एकत्र आलेल्या जगभरातील निधर्मी, उदारमतवादी, समाजवादी ‘विद्वान’ यांची परिषद ! १० ते १२ सप्टेंबर २०२१ या कालावधीत पार पडलेल्या ‘डिसमेंटलिंग ग्लोबल हिंदुत्व’ नावाच्या या परिषदेत या विद्वानांनी हिंदु धर्माच्या संदर्भात असलेल्या त्यांच्या विद्वत्तेचे जगाला दर्शन घडवले. Read more »

‘डिसमेंटलिंग ग्लोबल हिंदुत्व’ या परिषदेच्या विरोधात मुंबई आणि देहली येथील अमेरिकी दुतावासाजवळ हिंदुत्वनिष्ठ संघटनांची निदर्शने !

१० ते १२ सप्टेंबर या कालावधीत अमेरिकेत चालू असलेल्या ‘डिसमेंटलिंग ग्लोबल हिंदुत्व’ या आंतरराष्ट्रीय परिषदेमधून हिंदुत्वाच्या विरोधात मोठ्या प्रमाणात द्वेष पसरवून जगभरातील हिंदूंसाठी असुरक्षिततेचे वातावरण निर्माण केले जात आहे. Read more »

हिंदुत्वाला ‘ब्राह्मणवादी’ ठरवून त्यापासून धोका असल्याची हिंदुद्वेष्ट्या वक्त्यांची गरळओक !

‘हिंदुत्वनिष्ठांना ब्राह्मणवादाची पुनर्स्थापना करून हिंदु राष्ट्राची स्थापना करायची असून हे सर्व धोकादायक आहे’, या आणि अशा धादांत खोट्या, बिनबुडाच्या अन् पुरावे नसलेल्या अनेक हिंदुविरोधी वक्तव्यांचा भडीमार ‘डिसमेंटलिंग ग्लोबल हिंदुत्व’ (हिंदुत्वाचे जागतिक स्तरावरील उच्चाटन) या ऑनलाईन परिषदेत करून सहभागी वक्त्यांनी ‘हिंदुद्वेष त्यांच्या नसानसांत किती भिनला आहे ?’ याचे कडवे प्रदर्शन केले. Read more »

हिंदुद्वेषी दुष्प्रचार रोखण्यासाठी वैचारिक चर्चा करून धर्माचे रक्षण करायला हवे ! – मनीषा मल्होत्रा, जागतिक युवा समन्वयक, ‘इनफिनिटी फाऊंडेशन’

या कार्यक्रमामध्ये ‘इनफिनिटी फाऊंडेशन’च्या जागतिक युवा समन्वयक मनीषा मल्होत्रा आणि ‘एपिलोग न्यूज चॅनेल’चे अध्यक्ष अधिवक्ता टिटो गंजू यांनी मार्गदर्शन केले. Read more »

‘डिसमेंटलिंग ग्लोबल हिंदुत्व’ परिषदेचे आयोजन, हे जागतिक स्तरावर हिंदुद्वेष पसरवण्याचे षड्यंत्र ! – भारत गुप्त, माजी प्राध्यापक, देहली विद्यापीठ

‘डिसमेंटलिंग ग्लोबल हिंदुत्व’ (हिंदुत्वाचे जागतिक स्तरावर उच्चाटन) या आंतरराष्ट्रीय ‘ऑनलाईन’ परिषदेचे आयोजन द्वेषपूर्ण आणि हीनत्वाच्या भावनेतून करण्यात आले. हे आयोजन पूर्णत: राजकीय हेतूने प्रेरित आहे. दुर्दैवाने आज जागतिक पातळीवर हिंदु धर्म चुकीच्या पद्धतीने मांडला जात आहे. हिंदूंना अपकीर्त करण्याचे हे कुटील कार्य असून जागतिक स्तरावर हिंदुद्वेष पसरवण्याचे मोठे षड्यंत्र आहे. ही विचारसरणी (हिंदु) संस्कृतीला अपमानित करण्याची, तसेच धर्मपरिवर्तनाची मानसिकता निर्माण करणारी आहे. Read more »

‘ग्लोबल डिसमेंटलिंग हिंदुत्व’ या परिषदेला अमेरिका आणि कॅनडा येथील हिंंदूंच्या १५० संस्थांचा विरोध !

अमेरिका आणि कॅनडा या देशांतील हिंदुत्वाचे कार्य करणार्‍या संस्था, मंदिरे आणि आध्यात्मिक संस्था अशा एकूण १५० संस्थांनी ‘डिसमेंटलिंग ग्लोबल हिंदुत्व’ (हिंदुत्वाचे जागतिक स्तरावरील उच्चाटन) या परिषदेला पाठिंबा देऊ नये, अशा आशयाचे एक निवेदन ४० विद्यापिठांना पाठवले आहे. Read more »

हिंदु समाजाला हिणवणार्‍यांच्या विरोधात हिंदूंनी ठाम भूमिका घेणे आवश्यक ! – मारिया वर्थ, सुप्रसिद्ध लेखिका, जर्मनी

‘डिसमेंटलिंग ग्लोबल हिंदुत्व परिषद – एक दुष्प्रचार’ या विषयावर ६ सप्टेंबर २०२१ या दिवशी आयोजित केलेल्या ‘ऑनलाईन’ विशेष संवादात त्या बोलत होत्या. Read more »

Know More About this Issue >>

Leave a Comment








Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​