मुलांनो, शिक्षकांसोबत आपली वर्तवणूक अशी ठेवा !

१. शाळेतील शिक्षकांना ‘सर’ ऐवजी ‘गुरुजी’ म्हणा.

२. शिक्षक भेटल्यावर विनम्रपणे हात जोडून त्यांना ‘नमस्कार गुरुजी’, असे म्हणा.

३. सण व उत्सव यांच्या वेळी शिक्षकांना खाली वाकून नमस्कार करा.

४. शिक्षकांचा आदर राखून त्यांच्याशी नम्रतेने व प्रेमाने बोला.

५. वर्गातील इतर मुलांनाही शिक्षकांचा आदर राखण्यास शिकवा.

६. शिक्षकांमुळे विविध विषयांचे ज्ञान मिळत असल्याने त्यांच्याविषयी कृतज्ञ रहा.

– कु. गायत्री बुट्टे