मारुतीचा नामजप

         देवतेबद्दल भक्तिभाव निर्माण झाल्यानंतर देवतेचे नाम कसेही घेतले तरी चालते; पण भक्तिभाव लवकर निर्माण होण्यासाठी व देवतेच्या तत्त्वाचा जास्तीतजास्त लाभ होण्यासाठी नामाचा उच्चार योग्य असणे आवश्यक आहे.

         देवतेची तारक व मारक अशी दोन रूपे असतात. भक्ताला आशीर्वाद देणारे रूप म्हणजे तारक रूप, उदा. नेहमी आढळणारा आशीर्वाद मुद्रेतील मारुती . असुरांचा संहार करणारे रूप म्हणजे मारक रूप, उदा. लंकेत राक्षसांचा नाश करणारा मारुति. देवतेप्रति सात्त्विक भाव निर्माण होण्यासाठी तारक रूपाचा नामजप आवश्यक असतो, तर देवतेकडून शक्ती व चैतन्य ग्रहण होण्यासाठी मारक रूपाचा नामजप आवश्यक असतो.

         मारुतीचा तारक-मारक संयुक्त नामजप योग्य उच्चारासह कसा करावा, हे सांगितले आहे.

         ‘हं हनुमते नम: ।’ हा नामजप करतांना मारक भाव येण्यासाठी ‘हनुमते’ या शब्दातील ‘ह’ वर जोर द्यावा. या वेळी मारुतीचे मारक रूप आठवावे. ‘हनुमते’ या शब्दानंतर थोडा वेळ थांबून त्यानंतर ‘नम:’ हा शब्द म्हणावा. नामजपात तारक भाव येण्यासाठी ‘नमः’ या शब्दावर जोर न देता तो हळुवारपणे म्हणावा. या वेळी आपण मारुतीला साष्टांग नमस्कार करत आहोत, असा भाव ठेवावा.

मारूतीचा नामजप येथे ऐका !

Leave a Comment