मनोरंजनात्‍मक छंदांपेक्षा जीवनात लाभदायक ठरणारे छंद जोपासा !

व्‍यष्‍टी साधना म्‍हणजे ईश्‍वराच्‍या जवळ जाण्‍यासाठी स्‍वतः करायचे आणि समष्‍टी साधना म्‍हणजे समाज ईश्‍वराच्‍या जवळ जाण्‍यासाठी करायचे प्रयत्न.

मुलाचा छंद वेगवेगळा असू शकतो. झाडाची पाने वहीत ठेवून ती वाळवणे आणि त्‍यांचा संग्रह करणे, पोस्‍टाची तिकिटे किंवा नाणी जमवणे, सुतारकाम, शिवणकाम, संगीत, चित्रकला, भरतकाम, पक्षी-निरीक्षण अशा वेगवेगळ्‍या छंद असू शकतात. असे छंद मनोरंजन किंवा मौजमजा हा हेतू ठेवून जोपासलेले असतात. त्‍यापेक्षा व्‍यष्‍टी आणि समष्‍टी साधना करवून घेऊ शकणारे छंद जोपासल्‍यास त्‍यांचे जीवनात पुढील लाभ होतात.

१. अशा छंदांमुळे व्‍यष्‍टी आणि समष्‍टी साधना झाल्‍यामुळे ईश्‍वराची आपल्‍यावर कृपा होऊन आपले जीवन आनंदी बनते.

२. असे छंद जोपासल्‍यामुळे मुलांचा मोकळा वेळ वाया जात नाही कि वायफळ गप्‍पा मारणे किंवा वाईट मार्गाकडे वाटचाल होणे इत्‍यादी गोष्‍टी होत नाहीत.

३. या छंदांतून सतत नवीन काहीतरी करण्‍याची जाणीव मुलांमध्‍ये निर्माण होते. त्‍यामुळे स्‍वावलंबन निर्माण होते किंवा वाढते, तसेच मन राहू शकते.

व्‍यष्‍टी आणि समष्‍टी साधना करवून घेणारे काही छंद

१. रोपे लावून त्‍यांची फुले देवाला वहाणे : देवपूजेसाठी फुले विकत घेण्‍यापेक्षा घराच्‍या जवळ तुळस, मोगरा, जाई, चमेली आदींची रोपे / फुलझाडे लावावीत. त्‍यांना पाणी घालून आलेली फुले देवाला वहाण्‍यात अधिक आनंद मिळतो.

२. अध्यात्मप्रसार करणारे काही छंद : अध्‍यात्‍म व्‍हावा आणि मुलांना सतत सत्‌मध्‍ये रहाता यावे, यासाठी पुढे काही कृती दिल्‍या आहेत. मुलांनो, आध्‍यात्‍मिक छंद म्‍हणून या कृती रिकाम्‍या वेळेत किंवा सुटीच्‍या काळात कराव्‍यात.

अ. देवता आणि राष्‍ट्रपुरुष यांच्‍या चित्रांच्‍या चौकटी बनवणे किंवा ती चित्रे विविध ठिकाणी भिंतींवर लावावीत.

आ. सण-उत्‍सव आणि राष्‍ट्र-धर्मपर कात्रणांचा संग्रह करवा.

इ. राष्‍ट्रपुरुष, क्रांतीकारक, संत आदींची चित्रे काढावीत किंवा रंगवावीत.

ई.  हिंदु धर्मात सकाळच्‍या वेळी सडासंमार्जन करून रांगोळी काढण्‍याची प्रथा फार पूर्वीपासून चालत आली आहे. सण, उत्‍सव, धार्मिक विधी आणि देवपूजा या वेळी रांगोळी काढणे, हे मांगल्‍याचे समजले जाते. मुला-मुलींनी देवतेचे तत्त्व आकृष्‍ट करणारी सात्त्विक रांगोळी काढण्‍यास शिकावे.

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ, ‘सुसंस्कार आणि चांगल्या सवयी

Leave a Comment