अनमोल भेट

एकदा एक राजा एका सत्पुरुषाकडे गेला आणि म्हणाला, तुम्ही मागाल ती भेटवस्तू देण्याची माझी इच्छा आहे. बोला, काय पाहिजे ? माझा सारा खजिना, राजवाड्याचे वैभव, का माझे शरीर ?

ते सत्पुरुष म्हणाले, खजिना, राजवाडा ह्या गोष्टी तुझ्या प्रजेच्या आहेत. त्यांचा तू केवळ रखवालदार आहेस. तुझ्या शरीरावर तुझ्या पत्नीचा, मुलाबाळांचा हक्क आहे.

साधूचे ते बोलणे ऐकून राजा गोंधळला आणि म्हणाला, मग माझी स्वतःची अशी कोणती वस्तू आपणांस मी भेट देऊ ? तुम्हीच सांगा.

तो महात्मा उद्गारला, तुझ्या मनातील अहंकार हा सर्वस्वी तुझाच आहे. त्याचे दान तू अवश्य करु शकतोस.
अहंकाराचे तण सतत उपटून टाकून मनाची मशागत करावी लागते.

– (संदर्भ : जय हनुमान साप्ताहिक २ जानेवारी २०१६)

Leave a Comment