सृष्टीची निर्मिती

अशा भगवंताजवळ सृष्टीच्या निर्मितीचें कार्य कसें चालतें तें ब्रह्मदेवाला दिसलें

श्रेष्ठ सिद्धासनीं आरोहण । रमासमवेत रमारमण ।
तेथें सृष्टीचे कार्यकारण । ब्रह्मा आपण स्वयें देखे ॥५१॥

करावया सृष्टिसर्जन । ब्रह्मा पुढें देखे नारायण ।
सृष्टीचें कार्यकारण । आपुलें आपण निजशक्ति दावी ॥५२॥

चारी पांच आणि सोळा । ऐसा पंचविसांचा मेळा ।
आज्ञाधारक हरिजवळा । विधाता डोळां स्वयें देखे ॥५३॥

त्यांची शक्ति कोण कोण । कोण कार्य कोण कारण ।
कैसें कैसे त्यांचें लक्षण । नामाभिधान तें ऐका ॥५४॥

प्रकृति पुरुषमहदहंकार । हा चतुः शक्तींचा प्रकार ।
पंचशक्तींचाहि विचार । जाण साचार महाभूतें ॥५५॥

ज्ञानकर्मेद्रियांचें लक्षण । अकरावें गणिजे पैं मन ।
पंचतन्मात्रा विषय जाण । यापरी संपूर्ण षोडशशक्ती ॥५६॥

या पंचविसांच्या पोटी । ब्रह्मांडेसीं उठिजे सृष्टी ।
त्याहि माजी त्रिगुणत्रिपुटी । अतर्क्य दृष्टी विधाता देखे ॥५७॥

भगवंत हा षडगुणयुक्त असल्यानें त्याच्या भक्तांनाहि षड्गुणांची प्राप्ति होते

षड्गुणभाग्यें भाग्यवंत । यालागीं बोलिजे भगवंत ।
ज्ञानवैराग्य ऐश्वर्यवंत । यशश्रीमंत औदार्यैसी ॥५८॥

हे साही गुण भगवंती । सहज स्वाभाविक असती ।
योगानें करितां भगवदभक्ती । षड्गुणप्राप्ती तत्प्रसादें पैं ॥५९॥

सहज षड्गुण भगवंती । योगियां आगंतुक प्राप्ती ।
भक्तांतें भगवंत ह्नणती । जाण निश्चित्ती या हेतू ॥६०॥

पावोनी षड्गुणप्राप्ती । भक्तांतें भगवंत ह्नणती ।
ऐके तयांची नामकीती । संक्षिप्तस्थिती सांगेन तुज ॥६१॥

वसिष्ठ वामदेव नारद । व्यास वाल्मीक प्रल्हाद ।
शुक षड्गुणी प्रसिद्ध । इत्यादि अनुवाद भगवद्रूप पैं ॥६२॥

अगाध हरीचें उदारपण । दासां देऊनियां षड्गुण ।
भगवद्रूपीं परिपूर्ण । त्यांसी भिन्नपणें न देखे स्वयें ॥६३॥

देउनी षड्गुणसंपत्ती । भक्त भगवद्रूप होती ।
त्यांची उरोंनेदो भिन्न वृत्ती । चिदात्मस्थिती निजबोधें ॥६४॥

औदार्यसिंधु भगवंत

नवल सामर्थ्यांचे औदार्य । आपणासगटं दे षड्गुणैश्वर्य ।
अभिन्नज्ञानें तेजवीर्य । परात्परवर्य महामहिमा ॥६५॥

मर्दुंनी भक्तांचा जीवकण । भेद निरसुनी दे षड्गुण ।
स्वयें स्वरुपी रमारमण । स्वानंदमयपूर्ण परमात्मा ॥६६॥

अशा षड्गुणैश्वर्यसंपन्न नारायणाच्या दर्शनानें ब्रह्मदेव आत्मानंदीं रममाण झाला

यापरी श्रीनारायण । आनंदविग्रही चिदघन ।
त्यातें देखोनि चतुरानन । विस्मयें पूर्णं जाहला असे ॥६७॥

घवकरी देखिला हषीकेशी । घवकरी सत्त्व दाटलें त्यासी ।
प्रेम नसांवरे ब्रह्मयासी । सुखोमींसी विव्हळ होत ॥६८॥

घवघवीत शामसुंदर । देखतां मनीं मना विसर ।
चढिला सुखाचा महापूर । त्यामाजीं संसार बुडों पाहे ॥६९॥

चित्त चिंतेसी विसरलें । अहंसोहं एक जाहले ।
बुद्धिबोधा खेंव पडिलें । भरितें दाटले सत्वाचे त्या ॥७०॥

निजात्मज्योती लखलखिली । तेणें हरिखें जीवदशा लाजिली ।
देहीं देहत्वाची स्फूर्ति गेली । विषयाची झाली पाहांट तेथे ॥७१॥

मोडिलें त्रिपुटीचें विंदान । मावळोंलागे विकारभगण ।
जीवाशिवा होऊं पाहे लग्न । मधुपर्क विधान शुद्धसत्वें केलें ॥७२॥

गुरुकृपा अरुणोदय होत । अज्ञानअंधावर जाय तेथ ॥
इंद्रियें विषयीं नियुक्त । ती उठूं पाहत निजबोधें ॥७३॥

कंठी अतिबाष्प दाटला । तेणें शब्दव्यवहार खुंटला ।
गदगदोनीरोमांचीत जाहला । सर्वांगीं चालिला स्वेद कंप ॥७४॥

अंतरीं हर्ष कोंदाटोनी । आनंदाश्रु लोटले नयनीं ।
स्फुदें सुखोर्मीच्या स्फुंदनी । हर्षे विव्हळोनी विधाता पै ॥७५॥

ते सत्त्वावस्था आवरोन । अंगींचा स्वेद परिमार्जूंन ।
ब्रह्मा सावधान होऊन । वंदी श्रीचरण नारायणाचें ॥७६॥

Leave a Comment