चार श्लोक

चार श्लोकांत ब्रह्मदेवाला सुखी केलें

साचचि ब्रह्मा जन्मला पोटीं । यालागीं हरीसी कळवळ मोठो ।
पूर्णब्रह्म चौश्लोकांसाठीं । त्यासि उठाउठी वोपिता जाला ॥६॥

न माखतां शद्वाचें वदन । नायकतां श्रोत्राचे कान ।
न देखतां वृत्तीचे नयन । चौश्लोकीं चतुरानन सुखी केला ॥७॥

आतळों न देतां गगन । नलगतां सूर्यकिरण ।
प्राणस्पर्श न होतां जाण । चतुः श्लोकी चतुरानन सुखी केला ॥८॥

दूरीं दुरावोनि अज्ञान । जागें न होतां शहाणपण ।
मौनेचि जिवें जीव मारुन । चौश्लोकी चतुरानन सुखी केला ॥९॥

इशिया युक्ती नारायण । निजपुत्रालागी आपण ।
थोडे निरुपणॆं जाण । ब्रह्मपरिपूर्ण केला देवे ॥७१०॥

यथा महांति भूतानि भूतेषूच्चावचेष्वनु ।
प्रविष्टान्यप्रविष्टानि तथा तेषु न तेष्वहम् ॥५॥

एतावदेव जिज्ञास्यं तत्त्वजिज्ञासुनाऽऽत्मनः ।
अन्वयव्यतिरेकाभ्यां यत्स्यात्सर्वत्र सर्वदा ॥६॥

एतन्मतं समातिष्ठ परमेण समाधिना ।
भवान्कल्पविकल्पेषु न विमुह्यति कर्हिचित् ॥७॥

येथें नघडे हें निरुपण । शिष्य जालिया ब्रह्मसंपन्न ।
पुत्रस्नेह बापुडे कोण । त्यासि सदगुरु संपूर्ण पूज्यत्वें मानी ॥११॥

ब्रह्मसंपन्नतेपुढें । पुत्रसुख कायसें बापुडें ।
हे गुरुकृपा जयासी घडे । त्यासि करी रोकडें ब्रह्मपूर्ण ॥१२॥

जें बोला बुद्धी नातुडे । जें वृत्तीच्या हाता नचढे ।
तें द्यावया निजनिवाडें । खेवाचें धडफुडें मिस केलें ॥१३॥

हदया हदय एक झालें । ये हदयीचें ते हदयीं घातलें ।
यापरी न बोलतां बोलें । पूर्णत्व दिधलें प्रजापतीसी ॥१४॥

गुरु – शिष्य एक झाले

जेवीं दोन्ही दीप एक होती । प्रबळ चिच्छक्ती कोंदाटे ॥१५॥

ब्रह्मयाचें धन । ब्रह्मा परिपूर्ण ब्रह्म जाला ॥१६॥

तेथें बोध ना अबोध । स्वानंद ना निरानंद ।
गुरुशिष्य जाले एकवद । पूर्ण परमानंद सदोदित ॥१७॥

गुरुशिष्य जाले अभिन्न । खुंटला बोल पडिलें मौन ।
निः शेष विरालें मी तूंपण । अद्वय अलिंगन ऐसें पडिलें ॥१८॥

स्वरुपाचें नवलपण । अंगीं मुरालें ब्रह्मस्फुरण ।
निः शेष झालें विस्मरण । अव्ययज्ञान पावला विधाता ॥१९॥

यापरी श्रीनारायण । आपुलें देऊंनि पूर्णपण ।
पुढें करावया सृष्टिस्रजन । अकर्तात्मबोधें पूर्ण प्रबोधिला विरिंची ॥७२०॥

मुख्य बिंबी न होतां भिन्न । सूर्यापुढें प्रकाशती किरण ।
तेवीं नदेखोनि वेगळेपण । सुटलें अलिंगन हरिब्रह्मयांचें ॥२१॥

जळीं जळावरी वसती कल्लोळ । कल्लोळी असें सबाह्य जळ ।
तैसा अलिंगन मेळ । जाला वेगळ हरिब्रह्मयांचा ॥२२॥

जेवीं दीपें दीप लाविला । तेथें नकळे वडील धाकुला ।
तेवीं चिद्रूपें समत्वा आला । हरिरुप जाला प्रजापती ॥२३॥

Leave a Comment