प्रजापति

ब्रह्मदेवाला प्रजापति कां म्हणतात ?

जे प्रजांतें सृजूं शकती । ऐसियांचे करी हा उत्पत्ती ।
यालागीं ब्रह्मयातें ह्नणती । प्रजापति पति पुराणें तीं ॥७३॥

लोक ज्याच्या आज्ञें वर्तती । सर्व लोक ज्यातें भजती ।
यालागीं लोकपती ह्नणती । जाण निश्चिती ब्रह्मयातें ॥७४॥

लोकहितार्थ आचरण करणारा म्हणून त्याला धर्मपति असें म्हणतात

स्वधर्मकर्माची व्यत्पुत्ती । स्वधर्मकर्माची स्थितिगति ।
त्याचेनी वर्ते लोकांप्रती । यालागीं धर्मपती ब्रह्मयाते ह्नणिजे ॥७५॥

धर्मकर्मआचारस्थिती । प्रजा आचरुं नेणती ।
त्यासाठी यमनियमांची युक्ती । धाता आचारी निगुती वेदोक्तविधी ॥७६॥

पोटीं नाहीं कर्मावस्था । अथवा कर्मफळाची आस्था ।
तरी कर्म आचरे विधाता । लोकसंरक्षणार्थी यमनियम ॥७७॥

निजप्रजांचिया निजस्वार्था । कर्मे आचरोनी दावी धाता ।
स्वयें कर्म करोनि अकर्तां । लोकहितार्था यमनियम करी ॥७८॥

जें जें श्रेष्ठ आचरती । तें तें कर्म इतर करिती ।
यालागीं यमनियम प्रजापती । आचरे अनहंकृती लोकसंग्रहार्थ ॥७९॥

कुलालाचें वोसरे कर्म । पूर्वभ्रमें उरे चक्रभ्रम ।
तेवीं जीवन्मुक्तांचे देहकर्म । होतसे परमस्वभावेपैं ॥७८०॥

नदेखोनी सकामावस्था । ब्रह्मा केवळ लोकसंग्रहार्था ।
सकळलोकहितार्था । होय आचरता स्वधर्मकर्म ॥८१॥

सदगुरु श्रीनारायण । त्याची आज्ञा कीं हे संपूर्ण ।
करावें लोकसंरक्षण । यालागीं ब्रह्मा जाण यमनियम चाळी ॥८२॥

अनहंकृती स्वधर्मकर्म । ब्रह्मा आचरोनी नित्यनेम ।
येणें नारदाचा मनोधर्म । उत्कंठित पूर्ण परमार्थाविषयीं ॥८३॥

Leave a Comment