एकदा एका राजाच्या मुलीच्या पायाला काटा टोचला. राजे काहीसे लहरी असतात. राजाने प्रधानांना सांगितले की, सगळी जमीन चामड्याने झाकून टाक, म्हणजे युवराज्ञीला काटा टोचणार नाही. प्रधान विचारात पडला की, एवढे चामडे आणायचे कोठून ? त्याने एक चामड्याचा सुंदर जोडा युवराज्ञीला दिला.
तात्पर्य : जगात काटे आहेत; परंतु ज्याच्या पायात जोडे, त्याला काटे बोचत नाहीत; म्हणूनच स्वतःला सुधारावे; कारण सर्व जगाला आपण सुधारू शकत नाही.
– डॉ. वसंत बाळाजी आठवले (खिस्ताब्द १९९०)
अहंकार आणि गुरुद्रोह यांमुळे रसातळाला गेलेला बैजू बावरा यांचा शिष्य गोपाल !
तेनालीराम चे वाक्चातुर्य
खर्या भक्ताला रत्नांचे मूल्य दगडांइतकेच !
क्षमा
मोहामुळे भिकारी ठरला दुर्दैवी !
संघटितपणाचे महत्त्व