मॅडम कामा


मॅडम कामा यांचे मूळ छायाचित्र

मॅडम भिकाजी कामा यांचा जन्म २४ सप्टेंबर १८६१ साली एका पारसी कुटंबात झाला. मॅडम कामाचे वडील प्रसिध्द व्यापारी होते. मॅडम कामांनी इंग्रजीतुन शिक्षण घेतले. इंग्रजीवर त्यांचे चांगले प्रभुत्व होते. कामांनी रूस्तम के. आर. कामा यांच्याशी विवाह केला. ते सामाजिक कार्यकर्ते व वकील होते. परंतु दोघांचे विचार वेगवगळे होते. रूस्तम कामा हे त्यांच्या संस्कृती महान मानत होते. व मॅडम कामा आपल्या राष्ट्राच्या विचाराने भारावलेल्या होत्या त्यांना विश्वास होता की ब्रिटीश भारताला फसवत आहेत. त्यामुळे ते भारताचे स्वांतत्र्य मिळविण्यासाठी नेहमी विचारात असत. मॅडम कामा यांनी थोर समाजसेवक दादाभाई नौरोजी यांची सेक्रटरी म्हणून काम केले. कामांनी युरोपात युवकांना एकत्र करून स्वांतत्र्य मिळविण्यासाठी त्यांना मार्गदर्शन केले तसेच त्यांना ब्रिटीश शासनाबददल माहिती कामांनी दिली. मॅडम कामांनी लंडनमध्ये पुस्तक प्रकाशन सुरू केले त्यांनी विशेषत: देशभक्तीवर लिखाण असलेले पुस्तकांचे प्रकाशन केले. सावरकरांचे ‘१८५७ चा स्वांतत्र्य लढा’ हे पुस्तक प्रकाशित करण्यासाठी त्यांनी मदत केली. कामांनी स्वांतत्र्य मिळविण्यासाठी क्रांतीकारांना आर्थिक तसेच अनेक प्रकारची मदत त्या करत. १९०७ साली जर्मनीतल्या स्टुट्गार्ट येथे आंतरराष्ट्रीय साम्यवादी परिषद भरली होती. या परिषदेसाठी विविध देशांचे हजारोंच्यावर प्रतिनिधी आले होते. त्या परिषदेत मॅडम भिकाजी कामांनी साडी नेसून त्या परिषदेत भारतीय झेंडा घेऊन त्या लोकांना भारताबद्दल माहिती दिली.

मॅडम कामांनी फडकविलेला पहिला झेंडा


मॅडम भिकाजी कामा यांनी भारताचा पहिला झेंडा फडकविला. त्यात हिरवा, केशरी व लाल रांगाचे पट्टे होते. लाल रंग हा शक्तीचे प्रतिनिधीत्व करतो केशरी विजयाचे तर हिरवा रंग धीटपणा व उत्साहीपणाचे प्रतिक आहे. तसेच ८ कमळाचे फुले भारताचे ८ राज्यांचे प्रतिक होते. ‘वन्दे मातरम्’ हे देवनागरी अक्षरांमध्ये झेंडयाच्या मध्यात लिहले होते. तसेच सुर्य आणि चंद्र हे हिंदु-मुस्लिम विश्वासाचे प्रतिक होते. हा झेंडा सावरकर यांनी इतर क्रांतिकारांसह बनविलेला होता.


मॅडम भिकाजी कामायांची भारतीय डाक मुद्रांकावरील प्रतिमा