शहीद भगतसिंग

1267212088_bhagat-singh1

शहीद भगतसिंग

(फाशी – २३ मार्च १९३१)

          सरदार भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, बटुकेश्वर दत्त, भगवतीचरण व्होरा आदी क्रांतीकारक हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लीकन असोसिएशन या संघटनेचे सदस्य होते. सायमन कमिशनच्या विरोधात निदर्शने करतांना लाहोरच्या स्कॉट आणि साँडर्स या दोन आरक्षक अधिकाऱ्यांनी केलेल्या मारहाणीत लाला लजपतराय यांचे निधन झाले. या निर्दयी अत्याचाराचा प्रतिशोध म्हणून भगतसिंग प्रभुती क्रांतीकारकांनी साँडर्स या आरक्षक अधिकाऱ्याचा गोळया घालून वध केला. त्यानंतर भूमिगत असतांनाच भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त या दोघांनी दिल्ली विधीमंडळात बॉम्ब फेकून ब्रिटिश साम्राज्यशाहीला दुसरा धक्का दिला. या कटातील क्रांतीकारक भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांना फाशी देण्यात आली.