स्वातंत्र्यवीर सावरकर यांची ‘मार्सेलिस’ येथील जगप्रसिद्ध उडी !

मे, १९०९ मध्ये सावरकर बॅरिस्टर परीक्षा उत्तीर्ण झाले परंतु इंग्रज सरकारने त्यांना पदवी देण्यास नकार दिला. याची अनेक कारणे आहेत. लंडनमध्ये मदनलाल धिंग्रा यांनी कर्झन वायली या इंग्रज अधिकार्‍याला गोळ्या घालून ठार मारले.इग्लंडमध्ये एका भारतीय तरूणाने एका इंग्रज अधिकार्‍याला मारले हा मोठा पराक्रमच होता. मदनलालच्या या कृतिमागे सावरकरांचाच हात हॊता. भारतात सुद्धा इंग्रज सरकारच्या विरोधात कटाच्या अनेक घटना घडत होत्या. नाशिकच्याकटात सावरकरांचे अनेक बालमित्र पकडले गेले हॊते. त्यांचे वडीलबंधू गणेश सावरकर यांना जन्मठेपेची शिक्षा झाली, लहानभाऊ नारायण सावरकर यांनाही सरकारने पकडले होते. या सगळ्याच्या मुळाशी विनायक सावरकर आहेत अशाबातम्या इंग्रजांकडे असल्याने त्यांच्या हालचालींवर विशेष लक्ष ठेवण्यात आले.

फ्रान्सहून परत येताना इंग्रज सरकारच्या पोलिसांनी सावरकरांना अटक केली. सावरकरांवर हिंदुस्थानात राजद्रॊह केल्याचा आरॊप ठेवून तेथे खटला चालवण्यासाठी त्यांची रवानगी हिंदुस्थानात केली गेली.

१ जुलै, १९१० यादिवशी सावरकर हिंदुस्थानात परत येण्यासाठी ‘मॊरिया’ बॊटीत बसले. त्यांच्यावर रात्रंदिवस डॊळ्यात तेल घालून दोन इंग्रज पहारेकरी लक्ष ठेवून हॊते. सावरकरांच्या डॊक्यात इथुन कसे निसटता येइल हाच विचार चालूहोता. मोरिया बोट मार्सेलिस बंदरात यांत्रिक बिघाडामुळे काही काळ थांबली होती. सावरकरांनी बोटीचे निरीक्षण करून ‘पोर्ट हॊल’ मधून पसार हॊण्याचा निश्चय केला होता. अनायासे बोट इथे थांबली आहे, जर आपण इथुन पॊहत जावून फ्रान्सचा किनारा गाठला तर आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार इंग्रज अधिकारी आपल्याला पकडु शकणार नाहीत. या सगळ्या गोष्टींचा त्यांनी व्यवस्थित अभ्यास केलेला होता. ८ जुलै, १९१० रोजी शौचकूपात जावून तिथल्या काचेच्यादरवाज्यावर स्वतःचा अंगरखा ठेवला त्यामुळे बाहेर उभ्या पहारेकर्‍यांना आतल्या हालचाली दिसणार नाहीत. खरचटण्याची, ऒरखड्यांची व चामडी सॊलवटण्याची पर्वा न करता त्या अथांग सागरात सावरकरांनी उडी मारली. पॊहत पॊहतते फ़्रान्सच्या किनार्‍यावर पॊचले देखिल पण इंग्रज शिपायांच्या लालचीला बळी पडून फ्रान्सच्या पॊलिसांनी त्यांना इंग्रजांच्या स्वाधीन केले.

वरील घटनेचा अभ्यास केला असता काही गोष्टी प्रकर्षाने जाणवतात. एक म्हणजे समुद्रात उडी घेवून किनार्‍यापर्यंत पॊहत पॊहत पोचायचे हा निर्णय घेणे हे दुबळ्याचे काम नाही, यासाठी प्रचंड शारीरिक शक्ति आणि मनाचा निर्धार लागला असणार. दुसरी गोष्ट कायद्याचा व्यवस्थित अभ्यास आणि त्याचा अचुक वापर करण्याची बुद्धि. त्यांच्या याच गोष्टी मला खूप आवडून जातात. काही वेळा असेही वाटते योगसामर्थ्याने ‘लघिमा’ ‘गरिमा’ सारख्या योगसिद्धि तर त्यांना प्राप्त नव्हत्या? कारण, त्या एवढ्याश्या भोकातून सगळा देह बाहेर काढणे खरोखर आश्चर्यजनकच आहे.

सावरकराची ही उडी पाहून लोककवी मनमोहन म्हणतात,

ही उडी बघतांना मृत्यू कर्तव्य विसरला ।
बुरुजावर झेपावलेला झाशीतील घोडा हसला ।।
वासुदेव बळवंतांच्या कंठात हर्ष गदगदला ।
क्रांतीच्या केतूवरला अस्मान कडाडून गेला ।।
विश्वात केवळ आहेत विख्यात बहाद्दूर दोन ।
जे गेले आईकरिता सागरास पालांडून ।
हनुमानानंतर आहे त्या विनायकाचा मान ।।
– लोककवी मनमोहन

भारतात आल्यावर मुंबईत विशेष न्यायालय निर्माण करून सावरकरांवर इंग्रज सरकारने खटला चालवला. तसेच नाशिक कटाच्या दुसर्‍या खटल्याचे कामकाजही सुरू होतेच. दोन्ही खटल्यांचा निकाल लागला आणि सावरकरांना दोन जन्मठेपेची म्हणजे ५० वर्षे काळ्यापाण्याची शिक्षा ठोठावण्यात आली. हे ऐकून सुद्धा या वीराच्या प्रसन्नतेत काहीच फरक पडला नाही. उलट एक इंग्रज अधिकारी जेव्हा त्यांच्याशी कुत्सितपणे त्यांच्या या ५० वर्षे शिक्षेबद्दल बोलला तेव्हा सावरकरांनीच त्याला प्रतिप्रश्न विचारला, ‘ब्रिटिश सरकार तरी इथे अजुन ५० वर्षे टिकणार आहे का?’

सावरकरांची ही भविष्यवाणी खरोखरच खरी ठरली. आणि भारताला १५ ऑगस्ट१९४७ रोजी स्वातंत्र्य मिळाले.

Leave a Comment