राष्ट्रवादाच्या महानतम पुरोधांमधून एक, असे वर्णिले गेलेले बिपिनचंद्र पाल !

// <![CDATA[


// ]]>// <![CDATA[


// ]]>

“राष्ट्रवादाच्या महानतम पुरोधांमधून एक” असे वर्णिले गेलेले बिपिनचंद्र पाल, भारताच्या राजनैतिक इतिहासात लोकमान्य टिळक आणि लाल लाजपत राय याच्याबरोबर केलेल्या सहकार्यामुळे स्वातंत्र्यलढ्याशी संबंधित आहेत. साहस, साहाय्य व त्याग यांद्वारे संपूर्ण राजनैतिक स्वातंत्र्य किंवा स्वराजासाठी मागणीकेली.

पालक, शिक्षक, पत्रकार, लेखक आणि ग्रंथपाल होते. ब्राह्मो समाजाच्या समर्थक म्हणून आरम्भीत, बिपिनचंद्र वेदांताकडे वळले आणि शेवटी श्री चैतन्य यांच्या वैष्णव दर्शनाचे पुरोधा ठरले. एक कट्टर समाजसुधारक म्हणून त्यांनी जीवनांत दोन वेळा उच्चभ्रू समाजातील विधवेंशी लग्न केले आणि संमतीचा कायदा विधेयक(१८९१) ला पुरजोर समर्थन दिले. त्यांनी राजा राम मोहन रॉय, केशबचंद्र सेन,श्री अरबिंदो घोष, रबिन्द्रनाथ तैगोर, आशोतुश मुखर्जी आणि एनी बेसन्त प्रभृति आधुनिक भारताच्या निर्मात्यांवर शोधजन्य माहितीपर लेखमाला ही लिहिल्या. सार्वत्रिक दृष्टीकोन देणाऱ्या “सामंजस देशभक्ती”चा त्यांनी उपदेश दिला. “परिदर्शक”(१८८६-बांग्ला साप्ताहिक), “न्यू इंडिया(१९०२-इंग्रजी साप्ताहिक) आणि बंदे मातरम( १९०६-बांग्ला दैनिक) ही त्यांने चालू केलेली काही पत्रके.

सिल्हत (आताचा बांगलादेश) मधल्या एका गावातल्या एका संपन्न परिवारात ९ नोव्हेंबर १८५८ रोजी जन्मलेल्या पाल यांना त्यांचे शिक्षण माध्यमिक स्तरावरच सोडून द्यावे लागले. या वेळी ते केशबचंद्र सेन आणि पं.शिवनाथ शास्त्री यांच्यासारख्या ख्यातनाम बंगाली नेतांच्या प्रभावाखाली आले. त्यांना श्री अरबिंदो यांच्याविरुद्ध बंदे मातरम अभियोगामध्ये साक्ष द्यायला नकार केल्याबद्दल ६ महिने सश्रम कारावास भोगावे लागले. त्यांने इंग्लंड(३ वेळा) आणि अमेरिका-असे परदेशभ्रमण ही केले.

पाल यांनी १९२० मध्ये गांधींच्या असहकार आंदोलनाला विरोधही केले. १८८६ मध्ये सिल्हतचे प्रतिनिधि म्हणून त्यांने कॉंग्रेस अधिवेशनात भाग घेतले. १९२० मध्ये सक्रीय राजनीतीमधून जवळजवळ सन्यास घेऊन ते राष्ट्रीय प्रश्नांवर टिपणी मात्र करत राहिले. २० मे १९३२ रोजी हा महान देशभक्त कालवश झाला.