सकारात्मक दृष्टीकोन कसा असावा ?

शिष्याच्या अयोग्य दृष्टीकोनाला गुरूंनी दिलेला सकारात्मक दृष्टीकोन

दोन संन्यासी, म्हणजे गुरु-शिष्य ८ मासांनी (महिन्यांनी) पावसाळ्यात परत त्यांच्या झोपड्यांकडे आले. आल्यावर त्यांनी बघितले की, झोपड्यांचे अर्धे छप्पर उडून गेले आहे. शिष्य म्हणाला, ‘‘बघा, आपण भगवंताची आठवण करून करून मरतो, त्याचे फळ ! म्हणून मी सांगतो, प्रार्थना, पूजा इत्यादींत काही अर्थ नाही. दुष्टांचे बंगले चांगले राहिले आणि आपल्या झोपड्या पडल्या.’’

ज्या वेळी तो हे रागाने सांगत होता, त्या वेळी गुरु आनंदाने परमात्म्याला सांगत होते, ‘परमात्म्या, तुझी कृपा म्हणून अर्धे छप्पर अजूनही आहे.’ शिष्य चिंतेत होता; म्हणून त्याला रात्रभर झोप लागली नाही. गुरु पहाटे उठले, त्या वेळी अर्ध्या छपरातून चंद्र दिसत होता. त्यांनी कविता लिहिली. त्या कवितेत होते, ‘देवा, आम्हाला आधीच ज्ञात असते, तर आम्ही आधी अर्धेच छप्पर बांधले असते. आता आम्ही झोपतांना चंद्रही बघू शकतो !’

संदर्भ : सनातन निर्मित ग्रंथ, ‘बाेधकथा’

‘बोधकथा’ हा ग्रंथऑनलाईन खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a Comment