कृतीमागील विचार महत्त्वाचा

कृतीपाठचा विचार महत्त्वाचा

एका ठिकाणी ३ मजूर दगड फोडून मंदिर बनवत होते. एका माणसाने तिघांना विचारले, “तुम्ही काय करत आहात ?”

पहिला मजूर : दिसत नाही का ?

दुसरा मजूर : पोटासाठी दगड तोडतोय.

तिसरा मजूर : दगड तोडता तोडता गात उत्तरला, “भगवंताचे मंदिर बनवतो आहे.”

तात्पर्य – आपण काय करतो, हे महत्त्वाचे नाही, तर आपला त्याविषयी दृष्टीकोन काय आहे, हे महत्त्वाचे आहे.

सवयीचा परिणाम

१. एकदा एक माळीण आणि कोळीण आपापली फुलांनी भरलेली अन् माशांनी भरलेली टोपली आपल्या डोक्याजवळ घेऊन एकमेकींच्या जवळच झोपल्या. माशाच्या वासाने माळिणीला झोप येईना; म्हणून तिने कोळीणीच्या डोक्याजवळील माशाची टोपली लांब नेऊन ठेवली. तेव्हा नेहमीचा माशांचा वास येत नसल्याने कोळीणीची झोप नाहीशी झाली.

२. एकदा कडक थंडीमध्ये नायग-याचा धबधबा गोठून गेला. तेव्हा त्या गावी रहाणा-या सर्व लोकांना जाग आली; कारण नेहमीचा येणारा धबधब्याचा प्रचंड आवाज एकाएकी बंद झाला होता.

पती-पत्नीचे सुख आणि दुःख तुलनात्मक असणे

सुख आणि दुःख हे नेहमीच तुलनात्मक असते. एकदा एका बायकोने प्लँचेटवर नव-यास बोलावले आणि विचारले, ‘कसे आहात ?’ नव-याने उत्तर दिले, ‘चांगला आहे’. बायकोने विचारले, ‘कोणत्या स्वर्गात आहात ?’ नवरा म्हणाला, ‘स्वर्गात आहे, हे कोणी सांगितले ? मी नरकातच आहे; पण तू बरोबर नसल्याने पृथ्वीपेक्षा येथे अधिक सुख आहे, हे खरे !’

एका जोतिषाने एका माणसास सांगितले, ‘तुला अजून १० वर्षे दुःख भोगावयाचे आहे. त्या माणसाने विचारले, मग काय होईल ?’ जोतिषाने उत्तर दिले, ‘मग तुला दुःखाची सवय होईल !’

सत्याला धरून वागणायाचा सांभाळ ईश्वराने करणे

सत्याने वागणा-या गायीला वाघाने जीवदान देणे : एकदा एका भुकेलेल्या वाघाला गाय दिसली. वाघ तिच्यावर झडप घालणार हे पाहून गाय म्हणाली, ‘`वाघोबादादा, माझे वासरू फार लहान आहे. त्याला दूध पाजूनमी परत येते. नंतर मला खा !’’ वाघाला तिच्या बोलण्यावर विश्वास वाटला नाही. तेव्हा गाय म्हणाली, `‘सत्य हेच माझे आई-वडील, सत्य हेच माझेनातेवाईक. सत्याच्या मार्गाने मी गेले नाही, तर त्या परमात्म्याला ते आवडेल का ?’’ वाघाने तिच्यावर विश्वास ठेवला. तो म्हणाला, ‘`ठीक आहे. तू जाऊनये.’’ वासराला दूध पाजून थोड्या वेळाने गाय परत आली. तिला परत आलेली पाहून वाघाला मोठे कौतुक वाटले आणि त्याने तिला जीवदान दिले !

– (पू.) डॉ. वसंत बाळाजी आठवले (ख्रिस्ताब्द १९९०)