मराठी पाऊल पडते पुढे

मराठी पाऊल पडते पुढे…

खरा स्वधर्म हा आपुला

जरी का कठीणु जाहला

तरी हाचि अनुष्ठिला

भला देखे.

स्वराज्य तोरण…

स्वराज्य तोरण चढे

गर्जती तोफांचे चौघडे

मराठी पाऊल पडते पुढे

मराठी पाऊल पडते पुढे llधृll

मायभवानी प्रसन्न झाली

सोनपावली घरास आली

आजच दसरा आज दिवाळी

चला सयांनो, अंगणी घालू

कुंकुमकेशर सडे,

मराठी पाऊल पडते पुढे,

मराठी पाऊल पडते पुढे. ll१ll

बच्चे आम्ही वीर उद्याचे

बाळमुठीला बळ वज्राचे

वारस होऊ अभिमन्यूचे

दूध आईचे तेज प्रवाही,

नसांतुनि सळसळे,

मराठी पाऊल पडते पुढे

मराठी पाऊल पडते पुढे ll२ll

स्वयें शस्त्र देशार्थ हाती धरावे

पिटावे रिपुला रणी वा मरावे

तुझ्या रक्षणा तूच रे सिद्ध होई

तदा संकटी देव धावून येई

जय जय रघुवीर समर्थ

जय जय रघुवीर समर्थ

शुभघडीला शुभमुहूर्ती

सनई सांगे शकुनवंती

शुभघडीला शुभमुहूर्ती…

जय भवानी…. जय भवानी…

जय भवानी, जय भवानी

दशदिशांना घुमत वाणी,

जय भवानी….

जयजयकारे दुमदुमवू हे सह्याद्रीचे कडे….

Leave a Comment