पाकिस्तानी युद्धनौका ‘गाझी’चे पारध करणारे भारतीय नौकाधिपती निळकंठ कृष्णन !

१६ डिसेंबर म्हणजे बांगलादेश मुक्तीचा आणि भारताने पाकवर मिळवलेल्या विजयाचा दिन !

या ऐतिहासिक विजयदिनाला ४१वर्षे पूर्ण होत आहेत. या युद्धात सैन्यदलाच्या खांद्याला खांदालावून नौदल लढले. पाकिस्तानची युद्धनौका गाझीला पाण्यात बुडवण्याची यशस्वी कामगिरी भारतीयनौदलाने केली. या युद्धनीतीमध्ये नौकाधिपती कृष्णन यांचा सिंहाचा वाटा होता. त्यांच्याविषयीचा इतिहाससांगणारा हा लेख…

पाकिस्तानी युद्धनौका ‘गाझी’चे पारध करणारे भारतीय नौकाधिपती निळकंठ कृष्णन !

१. भारतीय नौदलाने केलेले अपूर्व कर्तव्याचे पालन !

‘खिस्ताब्द १९७१ च्या बांगलादेश युद्धातभारतीय नौदलाने पाकिस्तानची गाझी पाणबुडी बुडवून आणि कराची धक्क्यावर (बंदरावर) छोट्या; पणवेगवान क्षेपणास्त्र नौकांनी आक्रमण करून अपूर्व कर्तव्याचे (कामगिरी) पालन केले (बजावले) होते.

२. नौदलाकडून छोट्या क्षेपणास्त्र नौका वापरण्याचा सराव करून घेतल्या नेत्याचा लाभ पुढेकराची बंदरावरील आक्रमणासाठी होणे

नौदलासाठी छोट्या क्षेपणास्त्र नौका अत्यंत उपयुक्त ठरूशकतात, हे बांगलादेश युद्धाच्या काही वर्षे आधीच नौदल विकासाचा आराखडा सिद्ध करणार्‍यानावाधिपती (अ‍ॅडमिरल) कृष्णन यांच्या लक्षात आले होते आणि त्यांनी संरक्षणखात्याकडे या नौका विकतघेण्याची जोरदार प्रशस्ती (शिफारस) केली होती. एवढेच नाही, तर पुढे या नौका विकत घेण्यासाठीप्रारंभिक बोलणी त्यांनीच रशियन आरमाराचे प्रमुख ग्रँड अ‍ॅडमिरल गॉर्शकॉव्ह यांच्याशी केली होती.त्यानंतर मुंबईत नौदलाच्या पश्चिम विभागाचे प्रमुख असतांना त्यांनीच नौदलाकडून या बोटी वापरण्याचासराव करून घेतला होता. त्याचा लाभ पुढे कराची बंदरावरील आक्रमणासाठी झाला.

३. डावपेच यशस्वी झाल्याने गाझी विशाखापट्टण धक्क्यात येताच तेथे आधीच पेरून ठेवलेल्या भूसुरुंगांची शिकार होणे

तीच गोष्ट पाकिस्तानच्या गाझी पाणबुडीची ! खिस्ताब्द १९७१च्या युद्धात‘विक्रांत’ ही भारताची विमानवाहू नौका या पाणबुडीचे लक्ष्य असणार, हे कृष्णन यांनी ओळखले होते. त्यावेळी ते विशाखापट्टण येथे नौदलाच्या पूर्व विभागाचे प्रमुख होते आणि ‘विक्रांत’ त्यांच्याच विभागात होती.‘विक्रांत’ला असलेला धोका लक्षात घेऊन त्यांनी तिला विशाखापट्टण धक्क्यापासून अनेक किलोमीटर दूरबंगालच्या उपसागरात नांगरून ठेवले होते; पण आभास मात्र असा निर्माण केला होता की, ती विशाखापट्टणधक्क्यातच आहे. हेतू हा की, ‘विक्रांत’चा शोध घेत गाझी विशाखापट्टण धक्क्यात यावी. त्यांचे हे डावपेचयशस्वी झाले. गाझी विशाखापट्टण धक्क्यात आली आणि तेथे आधीच पेरून ठेवलेल्या भूसुरुंगांची शिकारझाली.

४. नौकाधिपती कृष्णन हे युद्ध डावपेचांत तज्ञ असल्याने त्यांना भारतीय नौदलाचा विकासआराखडा सिद्ध करण्याचे काम सोपवण्यात येणे

नावाधिपती कृष्णन हे युद्ध डावपेचांत तज्ञअसलेले नौदल अधिकारी होते. दुसर्‍या महायुद्धात जर्मन नौदलाशी टक्कर घेणार्‍या ‘अचिलेस’ (जी पुढे‘आयएनएस दिल्ली’ या नावाने भारतीय नौदलात सम्मिलीत झाली) आणि ‘सफॉक’ या ब्रिटिशयुद्धनौकांवर त्यांना थेट युद्धाचा अनुभव मिळाला होता. त्यामुळे पुढे भारतीय नौदलाचा विकास आराखडासिद्ध करण्याचे काम त्यांच्यावर सोपवण्यात आले. तेव्हा त्यांनी नौदलात पाणबुड्या, विमानवाहू नौकाआणि झटपट प्रहार करू शकणार्‍या नौका आणण्यास प्राधान्य दिले.

५. बांगलादेशाच्या युद्धाची पूर्ण आणि रीतसर आखणी नावाधिपती कृष्णन यांनी केली असणे

बांगलादेशाचे युद्ध हे भारतीय नौदलाचे ठळक आणि दृष्टीस भरावे, असे पहिले काम ! एक कराचीधक्क्यावरील आक्रमण सोडले, तर नौदलाला हे युद्ध प्रामुख्याने बंगालच्या उपसागरातच लढावे लागले.बांगलादेशामधून पळून जाऊ पहाणार्‍या पाकिस्तानी सैन्याचा सागरी मार्ग रोखणे, चितगाव धक्क्यातभारतीय सैन्य आणि युद्ध सामग्री नौकेतून उतरवणे, या सैन्याला विक्रांतवरील विमानांकडून हवाई संरक्षणपुरवणे आदी महत्त्वाचे काम नौदलाला करावे लागले. त्याची पूर्ण आणि रीतसर आखणी नौकाधिपतीकृष्णन यांनी केली होती. त्यामुळेच पूर्व पाकिस्तानातील पाक लष्कराचे प्रमुख महासेनापती (लेफ्टनंटजनरल) नियाझी शरण आले, तेव्हा त्यांची शरणागती सेनापती (जनरल) अरोरा यांच्यासह नौदलाकडूननावाधिपती कृष्णन यांनीही स्वीकारली होती.

६. पाकिस्तानी नौदलाने पाणबुड्या मिळवल्या असल्याने पाणबुडीविरोधी हेलिकॉप्टर समाविष्ट करण्याची प्रशस्ती कृष्णन यांनी करणे

भारतीय नौदलाच्या आधी पाकिस्तानी नौदलाने पाणबुड्या मिळवल्या होत्या. त्यामुळे नौदलविकासाचा आराखडा सिद्ध करणार्‍या कृष्णन यांना बरीच चिंता पडली होती. सागरी युद्धात पाणबुड्या अत्यंत घातक ठरू शकतात. त्यामुळे त्यांचा वेळीच शोध घेऊन नाश करणे आवश्यक असते. त्यासाठी पाणबुडी शोध अणि विनाशाचे तंत्र अवगत करणे आवश्यक होते.

दुसर्‍या महायुद्धातील पाणबुडी युद्धाचा अनुभव असल्यामुळे कृष्णन यांनी यावर सांगोपांग विचार करूननौदलात पाणबुडीविरोधी हेलिकॉप्टर समाविष्ट करण्याची प्रशस्ती (शिफारस) केली आणि भारतीयनौदलात सुप्रसिद्ध अशा ‘सी किंग’ हेलिकॉप्टरचा समावेश झाला.’

– श्री. दिवाकर देशपांडे, ए सेलर्स स्टोरी, लेखक : व्हाइस अ‍ॅडमिरल एन. कृष्णन, (महाराष्ट्र टाईम्स,२६.३.२०११)

Leave a Comment