शिक्षकदिन नको, तर गुरुपौर्णिमेला गुरुपूजनदिन साजरा करा !

‘डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ त्यांचा ५ सप्टेंबर हा जन्मदिवस शिक्षकदिन म्हणून भारतभर पाळला जातो. असा दिन पाळल्यामुळे विद्यार्थ्यांना काहीच आध्यात्मिक लाभ होत नाही.

५ सप्टेंबर हा शिक्षकदिन पाळण्याऐवजी त्याहूनही लाभकारक असा गुरुपौर्णिमेचा दिन ‘गुरुपूजनदिन’ म्हणून विद्यार्थ्यांनी पाळायला हवा; कारण गुरु हे तत्त्व आहे आणि त्या तत्त्वाचा गुरुपौर्णिमेच्या दिनी (आषाढ पौर्णिमेला) नेहमीपेक्षा १ सहस्र पटीने लाभ होतो आणि तोही आध्यात्मिक स्वरूपाचा, म्हणजे चैतन्य आणि कृपाशीर्वाद यांच्या स्तरावर होतो.

व्यावहारिक शिक्षण देणार्‍या शिक्षकांपेक्षा ‘ईश्वरप्राप्ती कशी करायची’, याचे मार्गदर्शन करणारे गुरु हे अनेक पटींनी श्रेष्ठ आहेत. केवळ दिन पाळण्यापेक्षा त्या दिवशी गुरुपूजन करणे, हे अधिक लाभदायक. गुरु हे सर्वांनाच मार्गदर्शक असल्याने विद्यार्थ्यांबरोबरच गुरुपूजन करणार्‍या इतरांनाही गुरुतत्त्वाचा लाभ होतो. ‘आपण आयुष्यभर विद्यार्थीदशेतच राहिले पाहिजे’, या निमित्ताने बिंबते.

अशा रितीने शिक्षकदिनाऐवजी गुरुपौर्णिमा साजरी केल्यास संपूर्ण समाजाचेच कल्याण होते.’

Leave a Comment