हस्ताक्षर वळणदार आणि सुवाच्य काढावे !

‘अक्षरावरून माणसाची पारख करता येते’, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. नीटनेटकेपणा, शिस्त, कलात्मकता, असे कितीतरी गुण एखाद्याचे अक्षर पाहून आपल्या लक्षात येतात.

‘सुंदर हस्ताक्षर हाच खरा अलंकार आहे’, हा सुविचारही प्रसिद्ध आहे. समर्थ रामदासस्वामी म्हणतात –

ब्राह्मणें (बालके) बाळबोध अक्षर । घडसुनी करावें सुंदर ।
जें देखतांचि चतुर । समाधान पावती ।।
अक्षरमात्रतितुकेंनीट । नेमस्त पैस काने नीट ।
आडव्या मात्रा त्या हि नीट ।आर्कुलींवेलांट्या ।।
-दासबोध,दशक १९, समास १, ओवी १, ३

अर्थ : मुलांनी प्रत्येक अक्षर घोटून घोटून म्हणजे सराव करून सुंदर करावे. अक्षर पाहून चतुर व्यक्तींना समाधान वाटेल, एवढे ते सुंदर असावे. प्रत्येक अक्षर नीट लिहिलेले असावे. प्रत्येक शब्दात सारखे अंतर असावे. काने आणि आडव्या मात्राही नीट असाव्यात. त्याचप्रमाणे रफार आणि वेलांट्याही नीट काढाव्यात.

हस्ताक्षर चांगले होण्यासाठी काय करावे ?

१. अक्षरे शांतपणे आणि एकाग्रतेने काढावीत.

२. हस्ताक्षर गोल आणि वळणदार काढावे.

३. दोन शब्दांमध्ये पुरेसे अंतर ठेवावे.

४. प्रतिदिन दुरेघी वहीत ५ ओळी तरी शुद्धलेखन लिहावे.

५. चांगले हस्ताक्षर असलेल्या व्यक्तीचे मार्गदर्शन घ्यावे.

६. लिहिण्यासाठी शक्यतो निळ्या शाईची लेखणी (पेन) वापरावी.

मुलांनो, नामजप लिहित असतांना सात्त्विकता वाढून एकाग्रतेने चांगले अक्षर काढण्याचा प्रयत्न होतो. तुम्हीही वहीत प्रतिदिन कुलदेवी आणि दत्त ( ‘श्री गुरुदेव दत्त।’ असा ) यांचा नामजप प्रत्येकी १ पाठपोट पान लिहा ! .

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ, ‘सुसंस्कार आणि चांगल्या सवयी

Leave a Comment