दूरचित्रवाणीला दूर कसे ठेवाल ?

दूरचित्रवाणी पहाणे, हे एकप्रकारचे व्यसनच आहे. लहान, तसेच थोरांनाही ते सुटता सुटत नाही; म्हणूनच मुलांनो, तुमच्यासाठी आम्ही काही पर्याय शोधले आहेत. जीवनात ठरवलेल्या ध्येयाप्रत पोहोचण्यासाठी तुम्ही अवश्य यांचा वापर करा !

वाचन किंवा अन्य छंद जोपासावेत

दूरचित्रवाणी पाहिल्यामुळे होणारे तोटे लक्षात घेऊन त्याचे ‘दूर….दर्शन’ करावे. मुलांनी या ‘इडियट बॉक्स’च्या स्वाधीन न होता पटांगणातील खेळ खेळावेत, नवनवीन गोष्टी शिकाव्यात, छंद जोपासावेत आणि व्यायाम करावा. तसेच ‘सारा तो रिमोट बाजूला आणि हाती धरा पुस्तकाला !’ हा मूलमंत्रही स्वीकारावा !

– कु. इंद्राणी पुराणिक, गोवा.

दूरचित्रवाणीचा मर्यादित वापर
हितकारी किंवा शैक्षणिक कार्यक्रमांसाठी करावा

‘दूरचित्रवाणीवर मनोरंजनात्मक चित्रपट, अश्लील नृत्याचा कार्यक्रम इत्यादी निरर्थक गोष्टी पहाण्यापेक्षा रामायण, महाभारत, छ. शिवाजी महाराज या मालिका; संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज यांसारख्या संतांच्या जीवनावर आधारित चित्रपट किंवा क्रांतीकारकांवरील मालिका पहाव्यात. ज्ञानवृद्धी करणारे आणि राष्ट्रप्रेम जागृत करणारे कार्यक्रम (‘डिस्कव्हरी’ आणि ‘नॅशनल जिऑग्रॉफी’ या चॅनेल्सवरील) मर्यादित वेळेत पहावेत.’

– श्री. प्रसाद म्हैसकर, पनवेल.

चला तर, आजपासून दूरचित्रवाणीवरील कार्यक्रम पहाण्याचा स्वतःचा वेळ प्रत्येक आठवड्याला अर्धा घंटा न्यून (कमी) करा !

सुटीच्या दिवशी दूरचित्रवाणीवरील कार्यक्रम पहाणे अत्यल्प करा !

परीक्षा जवळ आल्यावर दूरचित्रवाणी पहाणे बंदच करा !